दौंड-नगर येथील रेल्वे लोहमार्गासाठी १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी बांधकाम करून पूल उभारला होता. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात एक मूर्ती सापडली होती. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढून ठेवली आहे.भीमा नदीत 150 वर्षापूर्वीची शंकर मूर्ती सापडल्याचे वृत्त पंचक्रोशीत पसरले. मूर्ती पाहायला लोकानी गर्दी केली.काही भाविकांनी पूजा केली तर काही उत्साही भाविकांनी मूर्तीला दुग्धाभिषेक देखिल घातला.वृत्तपत्रांनी ही मूर्ती 150 वर्षे जुनी असल्याच्या बातम्या दिल्या.लोकमत/नवभारत
नवा खुलासा
स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात नदी पात्रात वाहून आली आहे.तर काहीनी शंका व्यक्त केली की एक टन वजनाची मूर्ती पाण्यात कशी वाहून येवू शकते.यावर आता नवा खुलासा आला असून सदर मूर्ती ही 16 वर्षे जुनी असून दौंड शहरापासून कुरकुंभ मार्गे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिरेगाव येथील असल्याची माहिती पुढे आली. तेथील श्री दत्त मंदिराच्यावर सोळा वर्षांपूर्वी ही मूर्ती बसविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.सदर मंदिराच्या शिखराचे काम करावयाचे असल्याने महादेवाच्या मुखाची ही मूर्ती काढून ठेवण्यात आली होती. परंतु अशी मूर्ती मंदिरात जमिनीवर ठेवणे योग्य नसल्याचा विचार करून १९ महिन्यांपूर्वी ही मूर्ती दौंड मधील नदीत विसर्जित केली होती.
भीमा नदीत 150 वर्षापूर्वीची शंकर मूर्ती?
सरपंच भरत खोमणे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे.
नदी पात्रात ही भग्न मूर्ती सापडल्यापासून भाविक त्याची पूजा करीत असून
काही उत्साही लोकांनी दुधाने मूर्तीस दुग्धाभिषेक देखील केला आहे.
मंदिराच्या शिखराचे काम करायचे असल्याने महादेवाची मूर्ती काढून ठेवली होती.
परंतु ती भग्न झाल्याने विधीपूर्वक पूजा करून ट्रॅक्टर – ट्रेलर मधून आणत दौंड येथे
ग्रामस्थांसह मी मूर्तीचे विसर्जन केले होते अशी माहिती समोर आली आहे. (source lokmat)
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)