चांदण्यांची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया..
चांदण्याची छाया कापराची काया,चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया।।२ चोचीतला चार देत होता सारा,चोचीतला चार देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा,आईचा उभारा देत होता सारा भिमाई परी चिलया पिल्यावरी, भिमाई परी चिलया पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया।। बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता,लोपली निराशा आता,,सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासाच्या आधी,विकासाचा पाय होता मजा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया।। झाले नवे नेते मलाई चे धनी,झाले नवे नेते मलाई चे धनी वामन च्या मणी येति जुन्या आठवणी,वामन च्या मणी येति जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी,झुंज दिली खरी रामकुंडावरी,दगड गोटे खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया।। चांदण्याची छाया कापराची काया,चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया।।
चांदण्यांची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया..
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वि जयंती.देशभरात आणि जगातही कोरोनाचे सावट गंभीर असल्याने अनेकांनी मागीलवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध online उपक्रम राबवून साजरे करण्याचे ठरवले आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कर्तुत्व आणि विचारांचा आदर जगभरात केला जातो.असाच आदर कॅनडा या देशाने केला असून या देशात मागीलवर्षापासून दरवर्षी आता “डॉ. बी. आर. आंबेडकर समता दिन” साजरा करण्यात येत आहे.
डॉ बाबासाहब आंबेडकर यांना कॅनडा च्या भूमीत सन्मान समता दिन
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्याने यूनाइटेड किंगडमच्या ( ब्रिटनच्या) राणी एलिज़बेथ द्वितीय यांच्या सहमतिने ,
14 एप्रिल हा दिवस ‘डॉ बी आर आंबेडकर समता दिवस’ (Dr. B. R. Ambedkar Equality Day ) जाहीर केला आहे.
कॅनडातील ‘चेतना एशोशिएशन’ आणि जय विर्दी यांनी यासाठी प्रयत्न केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव जगभरात होत असल्याने त्यांना विश्वरत्न असे संबोधले जाते.
“डॉ. आंबेडकरांचा जन्म भारतात झाला असला तरी, समानतेसाठीचे त्यांचे ध्येय संपूर्ण जगासाठी संबंधित आहे, अशा शब्दात बर्नबीचे कौन्सिलर साव धलीवाल यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रती आपल्या भावना कौन्सिल मीटिंग मध्ये व्यक्त केल्या.
“आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही समानतेच्या तत्व मूल्यांचे स्मरण व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वैचारिक चर्चा होणाऱ्या विचार-विनिमय हॉल मध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे” असे कौन्सिलर साव धलीवाल यांनी सांगितले.
भारताच्या या सुपुत्राचा जगभरात होणारा गौरव सन्मान हा तमाम भारतीय नागरिकांच्या मनात आनंद आणि अभिमान फुलवणारा आहे.
भारताची राज्यघटना लिहून भारतातील प्रत्येक घटकास नागरिकास समता आणि स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टीम जागल्या भारत विनम्र अभिवादन करत आहे.
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)