संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.
गाडगेबाबा रस्त्याने जात असताना,
समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली.
त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली.
इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून
त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला.
ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला.
तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला.
तेव्हा गाडगे बाबा म्हणाले, ” बिचार्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?”
“संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश“
1 भुकेलेल्यांना = अन्न
2 तहानलेल्यांना = पाणी
3 उघड्यानागड्यांना = वस्त्र
4 गोरगरिबांना =शिक्षणासाठी मदत
5 बेघरांना = आसरा
6 अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
7 बेकारांना = रोजगार
8 पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
9 गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
10 दुःखी व निराशांना = हिंमत
कीर्तनातून रोकडा धर्म सांगत माणसातील माणुसकी घडविणाऱ्या
राष्ट्रसंत गाडगे बाबा स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !!
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)