येत्या २१ डिसेंबर २०२० रोजी आपण एका अद्भुत घटनेचे साक्षिदार होणार आहोत. अशी घटना जी या आधी मानवाने ४ मार्च १२२६ साली अनुभवलेली असेल व या नंतर पुन्हा हा योग यायला सन २८१६, म्हणजे साधारण ८०० वर्ष वाट बघावी लागेल. ही असाधारण गोष्ट म्हणजे सुर्यमालेतील गुरु व शनी या वायुमहाग्रहांची होणारी युती.
गेले काही महिने अवकाशप्रेमींना संध्याकाळच्या आकाशात गुरु व शनी ग्रहांचे मनोहर दर्शन होत आहे आणि दिवसागणिक दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ येत आहेत. २१ डिसेंबरला या जवळकीचा परमोच्च बिंदू असेल जेव्हा पृथ्वीवरुन हे दोन्ही महागोल एकमेकांपासून केवळ ०.०६° अंतरावर दिसतील.

– दुर्मिळ का?
खरंतर पृथ्वीवरुन जरी हे दोन्ही ग्रह एकरूप होतांना दिसणार असले तरी वास्तविकतः दोन्ही ग्रहांच्या कक्षेमधे तब्बल ६५.५ कोटी किलोमीटर एव्हढे अंतर असेल. गुरुवा सुर्याभोवती एक परिक्रमा पुर्ण करायला ११.८६ वर्ष लागतात, तेच शनी अजुन दुर असल्याने तो २९.४ वर्षांत परिक्रमा करतो.
सुर्याभोवती परिक्रमा करतांना हे दोन्ही ग्रह साधारण दर २० वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात, त्याला आपण युती म्हणूया. तर प्रत्येक २० वर्षांनी होणारी ही युती, चित्र क्र.२ मधे दाखवल्याप्रमाणे, पृथ्वीवरुन बघताना पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ११७° पटींनी दुर होत जाते. पुन्हा सुर्याच्या विरुद्ध दिशेला पृथ्वी गुरु व शनी ग्रह एका प्रतलात यायला साधारण ८०० वर्ष लागतात म्हणून हा येऊ घातलेला २१ डिसेंबरचा योग दुर्मिळात दुर्मिळ आहे.

– ग्रहांची युती केव्हा व कुठे दिसेल?
अगदी आजही ते वर्षाअखेरपर्यंत हे दोन्ही ग्रह सुर्यास्तानंतर लगेचच नैऋत्य दिशेला ( दक्षिण-पश्चिम ) साध्या डोळ्यांनी दिसतात.
साधारण १०० मीमी दुर्बिणीने आपण शनीची कडी व गुरु ग्रहावरचे वादळाचे पट्टेही पुसटसे पाहू शकतो.
चित्रात दाखवल्याप्रमाणे १ डिसेंबरच्या २.१° पासुन दोघांमधील अंतर कमी कमी होत केवळ ०.०६° होईल.
तेव्हा हे ग्रह सलग न दिसता एकच दैदिप्यमान पुंज दिसतील.



लेखन – सागर पाबळे
अटलांटा, जॉर्जिया.
(ही माहिती विविध स्त्रोतांवरुन संकलित केलेली आहे.)
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)