सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये गुणवत्ता, विविधता आणि सर्वसमावेशकतेला डावलून एका विशिष्ट समाजातील उमेदवारांना प्राधान्य (प्रतिनिधित्व) दिले जात असल्याचा गंभीर आरोप भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तीन पानांचे पत्र लिहून न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी कार्यरत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
२७ नोव्हेंबर २०२६ रोजी लिहिलेल्या या पत्रात गवई यांनी सध्याच्या परिस्थितीत तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांसह
समाजातील वंचित घटकांना न्यायव्यवस्थेतील उच्च पदांवर पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
गवई यांनी पत्रात नमूद केले आहे की, देशाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांपेक्षाही कमी वाटा असलेल्या एका विशिष्ट समाजाचे
सर्वोच्च न्यायालयातील प्रतिनिधित्व अलीकडच्या काळात ४० टक्क्यांहून अधिक झाले आहे.
या समाजाचे नाव त्यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केलेले नाही.
मात्र, न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये समाजातील विविध घटकांना समान संधी मिळत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय कायदामंत्र्यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ देताना त्यांनी २०१८ पासून उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त झालेल्या
७१५ न्यायाधीशांपैकी केवळ २२ अनुसूचित जाती, १६ अनुसूचित जमाती, ८९ ओबीसी आणि ३७ अल्पसंख्याक प्रवर्गातील असल्याचे नमूद केले आहे.
न्यायाधीशांच्या बदल्यांबाबतही गवई यांनी आक्षेप नोंदवले आहेत. काही न्यायाधीशांच्या बदल्या आणि त्यानंतर झालेल्या पदोन्नतींमागील निकषांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉलेजियमच्या शिफारशींना महत्त्व असले तरी त्यामुळे कॉलेजियम उत्तरदायित्वापासून मुक्त होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संविधानाच्या अनुच्छेद १२४(२) चा संदर्भ देत राष्ट्रपतींनाही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत घटनात्मक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून न्यायव्यवस्थेतील समान प्रतिनिधित्व आणि घटनात्मक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 28,2026 | 11:30 PM
WebTitle — former-cji-br-gavai-letter-president-collegium-judicial-appointments-diversity






















































