मुंबई: आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधील दुसऱ्या वर्षाचा बी.टेक.चा विद्यार्थी आणि अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील तरुण साहिल वाकोडे याच्या संशयास्पद व दुर्दैवी मृत्यू प्रकरणाने आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले असून घटनेने मोठे गांभीर्य धारण केले आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमधील ‘आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ America’ (AANA) सह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संघटनांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आयआयटी बॉम्बे प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. साहिलच्या मृत्यूनंतर संस्थेने कोणतीही सखोल चौकशी न करता घाईघाईने त्याच्या चारित्र्याबद्दल सार्वजनिक वक्तव्य केल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घटनेची पार्श्वभूमी व एफआयआर
मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याचा १८ सप्टेंबर २०२६ रोजी परीक्षा हॉलमधून बाहेर काढल्यानंतर अवघ्या काही तासांत मृत्यू झाला. साहिलच्या कुटुंबीयांनी जात भेदभाव अन आधारित छळाचे (Caste-based harassment) गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (SC/ST Act) आयआयटी बॉम्बेच्या एका प्राध्यापकाविरुद्ध पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
संस्थेच्या भूमिकेवर आणि प्रतिमेवर प्रश्नचिन्ह
AANA आणि सहयोगी संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयआयटी बॉम्बेने सत्याची प्रतीक्षा न करता घटनेच्या अवघ्या एका दिवसामध्ये साहिलने परीक्षेत ‘चॅटजीपीटी’चा वापर केल्याचे जाहीर केले. ज्या संस्थेतील प्राध्यापकावर गंभीर गुन्ह्याखाली एफआयआर दाखल आहे, त्याच संस्थेने वस्तुस्थिती स्पष्ट होण्यापूर्वी मृत विद्यार्थ्याच्या वर्तनावर जाहीर भाष्य करणे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून, यामुळे साहिल आणि संपूर्ण एससी/एसटी समुदायाविरुद्ध शत्रुत्वाची व पूर्वग्रहाची भावना वाढीस लागल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
अनुत्तरित प्रश्न आणि सीसीटीव्ही फुटेज लीक प्रकरण
या दुर्दैवी प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. परीक्षेच्या नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन केले गेले होते का?
परीक्षा हॉलमधून बाहेर काढल्यानंतर साहिलसोबत नक्की काय घडले?
डीनच्या कार्यालयात नेमके काय घडले?
परीक्षा हॉलमधील सीसीटीव्ही फुटेज लीक करून ते माध्यमांमध्ये कसे प्रसारित केले गेले?
तर डीनचे कार्यालय आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अद्याप का लपवून ठेवले गेले आहेत?
एससी/एसटी सेल आणि फॅकल्टी फोरमच्या भूमिकेवर आक्षेप
निवेदनात आयआयटी बॉम्बेच्या एससी/एसटी सेल आणि फॅकल्टी फोरमच्या भूमिकेवरही कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. तपास सुरू असतानाच संस्थेच्या बचावासाठी एससी/एसटी सेलने वक्तव्ये जारी केली. तसेच, दुसरीकडे एफआयआरमधील आरोपी प्राध्यापकाच्या समर्थनार्थ घटनेच्या तीन दिवसांनंतर फॅकल्टी फोरमने कॅम्पसमध्ये मोर्चा काढला. साहिलच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कॅम्पसमध्ये एससी/एसटी विद्यार्थ्यांविरुद्ध भेदभावाचे अत्यंत चिंताजनक प्रकार घडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
प्रमुख मागण्या
या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आणि संस्थात्मक उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
1.सार्वजनिक क्षमाप्रार्थी आणि स्वतंत्र चौकशी: आयआयटी बॉम्बेने साहिलच्या वर्तनाबद्दलचे आपले घाईघाईने केलेले सार्वजनिक वक्तव्य मागे घ्यावे, त्याच्या कुटुंबीयांची माफी मागावी आणि एससी/एसटी प्रतिनिधित्व व बाह्य तज्ज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र चौकशी स्थापन करावी.
2.सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवणे: परीक्षा हॉल, कॉरिडोर्स आणि डीनच्या कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तातडीने सुरक्षित करून तपास यंत्रणांना व साहिलच्या कुटुंबीयांना/वकिलांना उपलब्ध करून द्यावे आणि फुटेज लीक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करावी.
3.एसआयटी (SIT) स्थापन करणे: महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाच्या विरोधातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी आणि पुरावे व साक्षीदारांचे संरक्षण करण्यासाठी कालबद्ध विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे.
4.रिक्त जागा भरणे व देशव्यापी ऑडिट: केंद्र व नियामक प्राधिकरणांनी IIT आणि केंद्रीय शिक्षण संस्थांमधील रिक्त SC/ST/OBC प्राध्यापकांची पदे कालबद्ध पद्धतीने भरावीत आणि SC/ST प्रतिनिधित्व, आरक्षण व पीएचडी प्रवेशाचे देशव्यापी ऑडिट करावे.
5.स्वयंप्रेरणेने दखल (Suo Motu): राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC), महाराष्ट्र SC/ST आयोग,
UGC आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाची स्वयंप्रेरणेने दखल घेऊन SC/ST विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे,
तक्रारींचे आणि संस्थात्मक grievance mechanisms चे कठोर देशव्यापी ऑडिट करावे.
विद्यार्थ्यांमागे भक्कम उभे राहण्याचे आवाहन
आयआयटी बॉम्बेमधील एससी/एसटी विद्यार्थ्यांना उद्देशून संघटनांनी म्हटले आहे की,
“तुम्ही एकटे नाही आहात आणि तुम्ही कटू वातावरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे नाही आहात.”
विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी किंवा समर्थनासाठी aanausa@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून,
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांची ओळख सुरक्षित ठेवण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
या निवेदनावर ‘आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका’ (AANA) सह अम्बेडकर इंटरनॅशनल सेंटर (AIC),
आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM – युरोप, भारत, नेदरलँड्स, लंडन),
आंबेडकर किंग स्टडी सर्कल (AKSC), इक्वालिटी लॅब्स (Equality Labs) यांसारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
#IITBombay #SahilWakode #AANA
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 01,2026 | 19:47 PM
WebTitle – iit-bombay-dalit-student-sahil-wakode-death-aana-high-level-inquiry























































