पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणात धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्याप विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी संपर्क असल्याच्या संशयावरून
पुणे ग्रामीण पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे अवैध दारू व्यवसाय आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांमधील कथित संबंधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या संदर्भातील आदेश जारी केले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दौंड उपविभागीय पोलीस कार्यालयातील सुभाष डोईफोडे, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजित शिवाजी काळे, पोलीस शिपाई सुमित नंदकुमार वाघ तसेच यवत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप यांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याचे या कर्मचाऱ्यांशी संपर्क असल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग यांच्या स्तरावर करण्यात आलेल्या चौकशी अहवालात संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन पोलीस दलाच्या शिस्तीला बाधक आणि संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस नियमांनुसार संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय निश्चित करण्यात आले असून वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच दिवसातून दोन वेळा हजेरी लावणे त्यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे पुणे विषारी दारू प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या व्यक्ती आणि यंत्रणांपर्यंत तपास पोहोचणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१८ निष्पाप नागरिकांचा बळी गेलेल्या या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून,
दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
आगामी काळात या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता
तपास यंत्रणांकडून नाकारण्यात आलेली नाही.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 01,2026 | 15:45 M
WebTitle – Four Policemen Suspended In Pune Spurious Liquor Death Case After 18 Fatalities























































