पारनेर मध्ये महापुरुषांविषयी डॉक्टर ची आक्षेपार्ह पोस्ट,महिलांनी चोप देत घातला चपलांचा हार ! पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे सोशल मीडियावर महामानव B. R. Ambedkar आणि बहुजन चळवळीचे नेते Kanshi Ram यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप असलेल्या एका डॉक्टर विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी डॉक्टरला महिला वर्गाकडून चोप सुद्धा देण्यात आला.या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
पारनेर डॉक्टर ची महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, महिलांना चोप देत घातला चपलांचा हार
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह स्वरूपाची पोस्ट शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
या प्रकरणाच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाळवणी येथे एकत्र आले. त्यावेळी संबंधित डॉक्टरविरोधात घोषणाबाजी करण्यात आली
आणि निषेध नोंदविण्यात आला. घटनेदरम्यान काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टरला काळे फासत चपलांचा हार घालण्यात आला आहे.
पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करावी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत
गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर भाळवणी आणि पारनेर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले असून फिक्स पॉइंटची संख्या वाढवण्यात आली आहे.
संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या असून समाजकंटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचा निर्णय पारनेर पोलिसांनी घेतला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 30,2026 | 14:40 PM
WebTitle – Tension Erupts In Parner Over Doctor’s Alleged Offensive Post On Ambedkar And Kanshi Ram























































