मुंबई — सोशल मीडियावर तथाकथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या ब्रिटनस्थित डॉक्टर आणि यूट्यूबर डॉ. संग्राम पाटील प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या लुकआऊट सर्क्युलर नोटीसवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
भाजप नेत्यांविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याच्या आरोपावरून डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या नावावर लुकआऊट सर्क्युलर नोटीस जारी करण्यात आली. या नोटीसमुळे त्यांना परदेशात, विशेषतः ब्रिटनला परत जाण्यात अडथळे येत असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
डॉ. संग्राम पाटील प्रकरणात हायकोर्टाचे निर्देश
डॉ. संग्राम पाटील यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत नमूद केले की, ते सध्या ब्रिटनमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी परत जाणे अत्यावश्यक आहे. मात्र, लुकआऊट सर्क्युलर नोटीसमुळे त्यांचे आयुष्य ठप्प झाले असून, त्यांना प्रवास करता येत नाही. त्यांनी स्पष्ट केले की, ते तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत, अगदी परदेशातूनही पोलिसांशी संपर्क ठेवून आवश्यक माहिती देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
या प्रकरणात डॉ. पाटील यांनी ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला, ॲडव्होकेट उज्ज्वलकुमार चव्हाण
आणि ॲडव्होकेट आदित्य हिरे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
याचिकेत पुढे असेही नमूद करण्यात आले की, 21 जानेवारीनंतर त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी पुन्हा बोलावलेले नाही.
18 डिसेंबर रोजी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम 353(2) लावणे योग्य नसल्याचा दावा करण्यात आला.
तसेच, कोठडीतील चौकशीची कोणतीही गरज नाही, असा मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला.
डॉ. संग्राम पाटील हे जळगाव येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब भारतातच स्थायिक आहे.
त्यामुळे ते कायमस्वरूपी देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
चौकशीदरम्यान मोबाईल फोन पोलिसांना न दिल्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की,
त्या फोनमध्ये रुग्णांची गोपनीय वैद्यकीय माहिती असल्याने तो सुपूर्द करणे शक्य नव्हते.
दुसरीकडे, राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांनी याचिकेला विरोध दर्शवला.
त्यांनी न्यायालयासमोर मांडले की, डॉ. पाटील यांचा ‘शहर आघाडी’ या फेसबुक पेजशी संबंध असल्याचा संशय आहे.
संबंधित पोस्टमुळे दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही बाब गंभीर आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी पोलिस तपासात सातत्याने सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी दर्शवली.
न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लुकआऊट सर्क्युलर नोटीसबाबत तातडीने निर्णय घेण्यास सांगितले असून,
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडिया अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फौजदारी कायदे आणि तपास यंत्रणांचे अधिकार यांमधील संतुलनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Dr Sangram Patil look out circular Bombay High Court हा मुद्दा केवळ वैयक्तिक प्रकरण न राहता, डिजिटल युगातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर मर्यादांवर व्यापक चर्चा घडवून आणत आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 25,2026 | 13:15 PM
WebTitle – Bombay High Court Orders Urgent Decision on Look Out Circular Against Dr Sangram Patil























































