खुटबाव (पुणे) – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे झालेल्या रेबीज आजाराने एका उच्चशिक्षित युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खामगाव परिसरातील गाडीमोडी येथील रहिवासी महेश राजेंद्र नागवडे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध असूनही रेबीजसारख्या आजारामुळे एका तरुणाचा जीव जाणे ही घटना आरोग्य व्यवस्थेसह समाजासाठीही गंभीर इशारा मानली जात आहे.
मितभाषी आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत
महेश नागवडे हे खामगाव दहिटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखापाल म्हणून कार्यरत होते. अभ्यासू, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे ते सहकारी आणि गावकऱ्यांमध्ये परिचित होते.पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने त्यांचं अचानक निधन झाल्याने खामगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गुरुवारी सकाळी खामगाव स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.
कुत्र्याच्या चाव्याची घटना आणि उपचारांची साखळी
६ नोव्हेंबर २०२५ रोजी महेश नागवडे यांना स्वतःच्या घराशेजारी पिसाळलेल्या कुत्र्याने पाठीमागून पायातील गुडघ्याच्या लवणीच्या भागात चावा घेतला होता. घटनेनंतर त्यांनी तातडीने उपचार घेतले. यवत येथील ग्रामीण रुग्णालय तसेच पुण्यातील ससून रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि इंजेक्शनचा कोर्स त्यांनी पूर्ण केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून येत होते, त्यामुळे कुटुंबीयांनाही दिलासा मिळाला होता.
अचानक बळावलेली लक्षणे आणि रेबीजचे निदान
मात्र सुमारे आठवड्यापूर्वी महेश यांना अचानक त्रास जाणवू लागला. खामगाव येथील खासगी रुग्णालयात आणि यवत येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तपासणीत रेबीजची लक्षणे आढळून आल्याने पुढील उपचारांसाठी डॉक्टरांनी बाणेर येथील नायडू रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. सखोल तपासणीनंतर डॉक्टरांनी रेबीजचे स्पष्ट निदान केले. सर्वतोपरी उपचार सुरू असतानाच ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता महेश यांची प्राणज्योत मालवली.
कुटुंबावर कोसळले दु:खाचे सावट
महेश यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित भाऊ, एक विवाहित बहीण आणि चुलते असा मोठा परिवार आहे.
महेश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दौंड तालुका संघटक काळूराम नागवडे यांचे पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या निधनामुळे नागवडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनी कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
लग्नाआधीच हिरावले गेले आयुष्य
महेश नागवडे यांच्या लग्नाच्या हालचाली सुरू होत्या. स्थळ निश्चित झाले असून
७ फेब्रुवारी रोजी लग्नाची तारीख ठरविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होता.
मात्र नवरदेव बनण्याच्या उंबरठ्यावर असतानाच काळाने झडप घातल्याने संपूर्ण खामगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेबीज आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका
खामगाव मधिल या पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने घडलेल्या घटनेमुळे भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेबीज हा एकदा लक्षणे दिसू लागल्यानंतर प्राणघातक ठरणारा आजार असल्याने कुत्रा चावल्यास तात्काळ व योग्य उपचार घेणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र या प्रकरणात उपचार पूर्ण करूनही युवकाचा मृत्यू झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना, भटक्या कुत्र्यांचे निर्बंधन आणि जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.
आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनासाठी गंभीर इशारा
पुणे जिल्ह्यासारख्या विकसित भागातही रेबीजमुळे मृत्यू होणे ही बाब आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था
आणि प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, नियंत्रण मोहिमा
आणि नागरिकांमध्ये रेबीजविषयी जागरूकता वाढवणे, या उपाययोजना तातडीने प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 10,2026 | 23:30 PM
WebTitle – Rabies Death in Pune District: Educated Youth Dies After Stray Dog Bite in Khamgaon























































