पॅरिस, २६ नोव्हेंबर २०२५ भारताच्या संविधानाचे मुख्य शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज यूनेस्को मुख्यालयात भव्यदिव्य अनावरण होत आहे. संविधान दिनाच्या (२६ नोव्हेंबर) निमित्त भारताच्या यूनेस्कोस्थित कायम प्रतिनिधी मंडळाकडून हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला होता.दुपारी ठीक २ वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता) होणाऱ्या या कार्यक्रमाला जगभरातील मान्यवर, राजनयिक, विचारवंत आणि आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहिले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी म्हटले , “आज संविधान दिनानिमित्त पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाले, ही आपल्या सर्वांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाला दिलेला हा योग्य सन्मान आहे. त्यांचे विचार आणि आदर्श आजही असंख्य लोकांना शक्ती आणि आशा देतात.”

It is a matter of immense pride that today, on Constitution Day, a bust of Dr. Babasaheb Ambedkar was unveiled at the UNESCO Headquarters in Paris. This is a fitting tribute to Dr. Ambedkar and his role in the making of our Constitution. His thoughts and ideals give strength and… pic.twitter.com/CbbsMEK7ji
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2025

बाबासाहेबांच्या समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना जागतिक पातळीवर मानाचा मुजरा करण्याचा हा सोहळा ठरला असून,
यूनेस्को मुख्यालयात भारताच्या संविधान निर्मात्याचा पुतळा उभारला जाणे ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट असून,
दलित, शोषित-वंचितांच्या मुक्तीचा जागतिक प्रतीक म्हणून बाबासाहेबांना मान्यता मिळाल्याचे हे निश्चितच द्योतक आहे.
असे भारताच्या यूनेस्को मध्ये कायम प्रतिनिधींनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे,

“डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या समता आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांना यूनेस्कोच्या मूल्यांशी जोडणे हा भारताचा सन्मान आहे. हा पुतळा केवळ एक स्मारक नव्हे, तर जगाला समानतेचा संदेश देणारा दीपस्तंभ ठरेल.”या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यूनेस्को आणि भारतीय दूतावासाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून करण्यात येणार आहे.जग जेव्हा संविधान दिन साजरा करत आहे, तेव्हा पॅरिसमधून बाबासाहेबांचा संदेश पुन्हा एकदा विश्वाला प्रेरणा देणार आहेत.
जय भीम! जय भारत!
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 26,2025 | 23:40 PM
WebTitle – Dr. Babasaheb Ambedkar’s statue unveiled in Paris























































