भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात।।
पाडली अशी खाली, माजलेली विषमता
डाव होते समतेचे, भीम पहिलवानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात।।
जात पोळली माझी, रूढीच्या निखाऱ्यावर
फुल आले क्रांतीचे, या वाळलेल्या त्या रानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात।।
गावकीचा जोहर,संपला आता माझा
दिल्ली आम्ही पाहिली, त्या भीम संविधानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात।।
बाटली बैलगाडी, काल आमच्या स्पर्शाने
मी टाय कोट घालुनी, आता चाललो विमानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात।।
बुद्धीच्या किनाऱ्यावर, विश्व तू चकित केले
बुद्धीच्या सागरातील , मंथन भीमात होते
समतेच्या भावनातील, चंदन भीमात होते
तालात जीवनाच्या, विषमता नाचली ही
न्यायाची रागदारी, कुंजन भीमात होते
संकल्प या मनाचा ,क्रांती करून गेला
निधड्या मनाचा मोठा,होऊन सिंह गेला
दिपविले कैक ज्ञानी, माझ्या धुरंधराने
इतिहास घडविला, माझ्या युगंधराने।
ही आस नाही केली ,श्रीमंतीच्या धनाची
फुलविली बाग ऐसी , येथे परिश्रमाची
दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा
गुणवंत पाहिला मी, अन्यायी झुंजणारा
विसरून गेला शेवटी, जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला, माणूस करून गेला
काळाच्या डोळ्यावरती, बसलेली होती कात
तू दाविली पहाट, उज्वल प्रखर ती ज्योत
न्यायाच्या आदर्शावर,संघर्ष तुझा होता
या दीन बांधवांना,आदर्श तुझा होता
बंधुत्व व न्याय,ज्याने, हृदयात साठविले
दलितांचे राजकारण,दिल्लीला पाठविले
बुद्धीच्या किनाऱ्यावर, विश्व तू चकित केले
तो पाहिला महासागर, पुस्तकाच्या ज्ञानात
बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात।।
Song Details: SONG: BHIMRAYAMULE AAMHA BUDDH MILALE
SINGER: Anand Shinde
MUSIC: Harshad Shinde, Anand Shinde
LYRICS: Sagar Pawar
MUSIC LABEL: T-SERIES

Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 14,2024 | 07:00 AM
WebTitle – Bheemsurya Kranticha pahila vidhanat buddh jyane davila pimplachya panat