केरळमधील IAS अधिकारी एन प्रशांत, ज्यांना ‘कलेक्टर ब्रो’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांच्यासह दोन IAS अधिकाऱ्यांवर केरळ सरकारने शिस्तभंगाच्या कारणास्तव मोठी कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या आदेशानुसार, निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये के गोपालकृष्णन आणि एन प्रशांत यांचा समावेश आहे. हे दोन्ही अधिकारी वेगवेगळ्या कारणांमुळे निलंबित करण्यात आले आहेत.
के गोपालकृष्णन यांच्यावर धार्मिक व्हॉट्सअॅप ग्रुप चालवण्याचा आरोप आहे. त्यांच्या नावाने ‘मल्लू हिंदू ऑफिसर्स’ नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आला होता, ज्यामुळे वाद निर्माण झाला. गोपालकृष्णन यांनी दावा केला की त्यांचा फोन हॅक झाला होता, परंतु फॉरेन्सिक तपासणीत असा कोणताही पुरावा आढळला नाही. दुसरीकडे, ‘कलेक्टर ब्रो’ नावाने प्रसिद्ध एन प्रशांत यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सार्वजनिक टीका केल्याबद्दल शिस्तभंगाच्या कारणास्तव निलंबित करण्यात आले. प्रशांत यांना सध्या फेसबुकवर 3 लाखांहून अधिक आणि इंस्टाग्रामवर 50,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियाद्वारे जनतेशी जोडण्याचा त्यांचा हेतू आहे.
सोशल मीडियावरही या निर्णयावर चर्चा सुरू झाली आहे.
के गोपालकृष्णन यांनी असा दावा केला की, त्यांच्या फोनला फॉर्मेट केले गेले होते, ज्यामुळे हॅकिंगचा कोणताही पुरावा मिळू शकला नाही. तसेच ‘कलेक्टर ब्रो’ एन प्रशांत, ज्यांना सध्या कृषी विकास आणि शेतकरी कल्याण विभागाचे विशेष सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता, त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. प्रशांत यांनी फेसबुकवर अतिरिक्त मुख्य सचिव ए जयतिलक यांना ‘सायकोपॅथ’ म्हणून संबोधून त्यांच्यावर चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा आरोप केला. या प्रकरणामुळे सरकारने कडक कारवाई केली आणि प्रशांत यांना निलंबित केले. सोशल मीडियावरही या निर्णयावर चर्चा सुरू झाली आहे.
शिस्तभंग सहन केला जाणार नाही
प्रशांत यांनी त्यांच्या विरोधातील कारवाईबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की,
संविधानाने प्रत्येक नागरिकाला टीकेचा अधिकार दिला आहे. मी व्हिसलब्लोअर आहे, आणि माझी टीका करण्याचा हेतू चुकीच्या गोष्टींना विरोध करणे हा होता. सरकारच्या धोरणांवर टीका केलेली नाही, मात्र मुद्दे मांडणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
याआधीही प्रशांत यांच्यावर आरोप झाले होते, जिथे माजी राज्य मत्स्य मंत्री मर्सीकुट्टी अम्मा यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत यांना निलंबित करण्यामागे काही राजकीय कारणेही असू शकतात. केरळच्या राजस्व मंत्री के राजन यांनी अधिकाऱ्यांना शिस्तीचे पालन करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यात तैनात असताना कोणत्याही अधिकाऱ्याचा शिस्तभंग सहन केला जाणार नाही.
एक व्यक्तीला अटक
केरळमधील कण्णूर जिल्ह्यातील थालसेरीचे रहिवासी एन प्रशांत यांनी तिरुवनंतपुरम येथील लोयोला स्कूल
आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून 2007 साली IAS मध्ये प्रवेश केला.
एन प्रशांत यांची 2015 मध्ये कोझिकोड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
या काळात, त्यांच्या सक्रिय सोशल मीडिया सहभागामुळे त्यांना “कलेक्टर ब्रो ” म्हणून ओळखले जाऊ लागले,
जिथे ते लोकांशी संवाद साधून विविध उपक्रमांना प्रोत्साहन देत असत.
असेच एक उदाहरण म्हणजे जेव्हा त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून 14 एकराच्या तलावाची साफसफाई करण्यासाठी लोकांकडून मदत मागितली आणि बक्षीस म्हणून मालाबार बिर्याणीची एक प्लेट देण्याचे आश्वासन दिले. या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि नंतर स्वयंसेवकांना बिर्याणीची मेजवानी देण्यात आली. वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा एका IAS अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली की त्यांचा वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबर हॅक करून त्याचा वापर धार्मिक ग्रुप तयार करण्यासाठी केला जात आहे. त्यांनी तिरुवनंतपुरम शहराच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 14,2024 | 16:45 M
WebTitle – Kerala-government-action-collector-bro-ias-officers-suspended-reason