कॅनडा : कॅनडा मध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्यापासून तणावपूर्ण वातावरण आहे. तिथे राहणाऱ्या हिंदू समुदायामध्ये त्यांच्या सुरक्षेबद्दल भीती आहे. रविवारी अल्बर्टा येथे भारतीय कॉन्सुलेटच्या वतीने एक कॅम्प आयोजित करण्यात येणार होता, परंतु हिंसेच्या भीती मुळे तो रद्द करण्यात आला. हा कॅम्प वॅन्कुव्हर स्थित भारतीय कॉन्सुलेटने आयोजित केला होता. या घटनांमुळे हिंदू समुदायामध्ये भीती चे वातावरण आहे. एका सर्वेक्षणानुसार, देशातील बहुतेक हिंदूंनी म्हटले आहे की, ते त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंतित आहेत. तसेच, त्यांचा कॅनडा सरकारवरचा विश्वास कमी झाल्याचे दिसून येत आहे.
मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर ही चिंता अधिक वाढली
मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर ही चिंता अधिक वाढली आहे. अल्बर्टा येथे ज्या ठिकाणी कॅम्प होणार होता, तिथे खलिस्तानी समर्थक प्रदर्शन करायला आले होते, मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांना थोड्याच अंतरावर थांबवले. रविवारी रात्री खलिस्तानी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’ने भारतीय डिप्लोमॅट्सच्या कॅम्पमध्ये अडथळा आणण्याचा इशारा दिला होता. या संघटनेने ग्रेटर टोरोंटो एरिया मधील १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कॅम्प्सचाही उल्लेख केला होता.
कॅनडा सरकारने सुरक्षेची हमी दिली नाही
टोरोंटो स्थित भारतीय कॉन्सुलेटने मागील आठवड्यात घोषणा केली होती की काही काऊन्सिलर कॅम्प्स रद्द करण्यात येणार आहेत, कारण कॅनडा सरकारने सुरक्षेची हमी दिली नाही. या पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषद कॅनडा आणि व्हॉइस ऑफ कॅनेडियन हिंदूने केलेल्या सर्वेक्षणात हिंदूंमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणानुसार, ९८.५% हिंदूंना मंदिरावर झालेल्या हल्ल्याची माहिती आहे. तसेच ओंटारियो आणि ब्रिटिश कोलंबिया मधील ९५% हिंदूंनी सांगितले आहे की, हल्ल्यांनंतर ते सुरक्षित वाटत नाहीत.
तसेच, ९८% हिंदूंनी जस्टिन ट्रुडो सरकारच्या भूमिकेला खराब किंवा अत्यंत खराब म्हटले आहे. ९६% लोकांनी कनाडाची कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींबद्दलही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वेक्षणात १००० पेक्षा जास्त कॅनडास्थित हिंदूंनी भाग घेतला होता.
मंदिर हल्ला प्रकरणी एका व्यक्तीला अटक
ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरात झालेल्या हिंसक निदर्शनादरम्यान शस्त्राने हल्ला केल्याच्या आरोपावरून
कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पील प्रादेशिक पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, 21 डिव्हिजन क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो
आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम (SIT) च्या तपासनीसांनी 35 वर्षीय इंद्रजीत गोसल याला ब्रॅम्प्टन येथून अटक केली आहे आणि त्याच्यावर आरोप ठेवले आहेत.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 11,2024 | 12:50 PM
WebTitle – fear-among-hindus-canada-khalistani-threats-indian-camp-canceled
#CanadaNews #HinduSafety #KhalistaniThreat #IndianCommunity #CanadaHindus #JustinTrudeau #TempleAttack #WorldNews