पॅरिसमध्ये यावर्षी झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफ (Imane Khelif) पुरुष असल्याचा रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे. फ्रेंच पत्रकार जाफर ऐत औदिया Djaffar Ait Aoudia यांनी खलीफ यांची वैद्यकीय रिपोर्ट सार्वजनिक केली आहे. या रिपोर्टनुसार खलीफ यांचा जन्म ‘अंडकोष’ आणि ‘सूक्ष्म लिंग’ असलेल्या अवयवांसह झाला आहे. ही बातमी खलीफ यांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही महिन्यांनी समोर आली आहे.
फ्रेंच मीडिया ‘ले करस्पोंडेंट’मध्ये प्रकाशित औदिया यांच्या रिपोर्टनुसार, बॉक्सर इमान खलीफ (Imane Khelif) यांच्या वैद्यकीय रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की त्यांच्या शरीरात ‘गर्भाशय नाही’ आणि ‘पोटात अंडकोष’ आहे. तसेच त्यांच्याकडे “ब्लाइंड वजायना” आणि ‘क्लिटोरल हायपरट्रॉफी’ रूपात एक सूक्ष्म लिंग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हा रिपोर्ट फ्रान्समधील पॅरिसच्या क्रेमलिन-बिसेट्रे हॉस्पिटल आणि अल्जेरियाच्या अल्जीयर्समधील मोहम्मद लामिन देबाघिन हॉस्पिटलने एकत्रितपणे तयार केला आहे. या रिपोर्टमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की इमान खलीफ यांना 5-अल्फा कमीपणाचा विकार आहे.
2023 मध्ये इमान खलीफ Imane Khelif ला अयोग्य घोषित करण्यात आले होते
5-अल्फा कमीपणा हा विकार मुख्यतः पुरुषांवर परिणाम करतो. यामुळे जन्माच्या वेळी बालकाचे लैंगिक अवयव सामान्यतः विकसित होत नाहीत. या विकारामुळे जननांग अविकसित होतात आणि त्यामुळे नर बालकाला मादी समजले जाते. वैद्यकीय रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की इमान खलीफ Imane Khelif यांचा जन्म शक्यतो रक्ताच्या नात्याने संबंधित असलेल्या पालकांपासून झाला आहे.
पॅरिस ऑलिंपिकमधील बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान इमान खलीफ यांना जैविक लिंग आणि लिंग ओळख तपासण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागल्या.
अनेकांनी असा दावा केला की खलीफ ट्रान्सजेंडर आहेत.
2023 मध्ये, इमान खलीफ यांना पात्रतेमध्ये अपयश आल्याने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून अयोग्य घोषित करण्यात आले होते.
याशिवाय, यावर्षीच्या अंतिम 16 सामन्यात खलीफ यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या इटलीच्या एंजेला कैरिनी यांनी पहिल्या फेरीतच फाईट सोडली होती.
त्या म्हणाल्या की, “अशा प्रकारचा पंच त्यांनी कधीच अनुभवलाच नव्हता.” त्यांच्या अंतिम सामन्यातून माघार घेतल्यानंतर खलीफ यांना विजयी मानून सुवर्णपदक देण्यात आले होते.
— Riley Gaines (@Riley_Gaines_) November 4, 2024
इमान खलीफ यांच्यावर आता काय कारवाई होईल?
समोर आलेली ही वैद्यकीय रिपोर्ट खरी असल्यास प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे इमान खलीफ यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हे पहिलेच प्रकरण नाही जेव्हा इमान खलीफ यांच्या लिंगाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिंपिकदरम्यान हे प्रकरण समोर आले होते. यापूर्वीही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडून त्यांना बंदी देखील भोगावी लागली होती.
जेंडरवर उठलेल्या प्रश्नाबद्दल इमान खलीफ यांची सध्यातरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
परंतु यापूर्वी त्यांनी स्वतःला इतर महिलांप्रमाणेच असल्याचे सांगितले होते. परंतु वैद्यकीय रिपोर्ट त्यांच्या या विधानाला विरोध करणारी आहे.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08,2024 | 10:26 AM
WebTitle – paris-olympics-gold-medalist-imane-khelif-gender-controversy-report