वडीगोद्री: मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी मुस्लिम, बौद्ध आणि दलित नेत्यांसोबत चर्चा केली. मराठा, मुस्लिम आणि दलित यांच्यात एकजूट निर्माण झाली असून, बंजारा आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी, ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष मौलाना जहीर अब्बास रिझवी, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर आणि अन्य नेते उपस्थित होते. जरांगे यांनी स्पष्ट केले की अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी मुस्लिम, दलित आणि मराठा समाज एकत्र आला आहे. ते म्हणाले, “आम्ही सत्ता परिवर्तनासाठी एकत्र आलो आहोत. ३ नोव्हेंबरला मतदारसंघ आणि उमेदवारांची घोषणा करू. समाजाने आता मागे हटू नये.”
तिसरी आझादी
सज्जाद नोमानी यांनी भारतात विभाजन करणाऱ्या शक्ती सत्तेत असल्याचे म्हटले, “महाराष्ट्राचा आर्थिक विकास आणि अस्मिता धोक्यात आली आहे. धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे काम केले जात आहे, हे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या विरुद्ध आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गरीबांवरील अन्याय यावर आवाज उठवला.
आनंदराज आंबेडकर म्हणाले की, गरिबांना सत्तेत स्थान देणे हाच त्यांचा उद्देश आहे.
तर राजरत्न आंबेडकर यांनी या एकजुटीला तिसरी आझादी असल्याचे म्हटले आहे.
“महाराष्ट्रात आता नव्या राजकीय समीकरणाची लाट येत आहे.
मुस्लिम, दलित, मराठा एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी मतदारांना आवाहन केले की, जिथे मराठा उमेदवार असेल तिथे दलित-मुस्लिम यांनी मतदान करावे, जिथे दलित उमेदवार असेल तिथे मराठा-मुस्लिमांनी साथ द्यावी, आणि मुस्लिम उमेदवार असतील तिथे मराठा-दलितांनी १०० टक्के मतदान करावे. लवकरच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा घेण्याचेही त्यांनी सांगितले.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 01,2024 | 12:50 PM
WebTitle – Maratha, Muslim, and Dalit Leaders Unite for Social Change in Maharashtra manoj jarange
#ManojJarange #MarathaReservation #SocialUnity #MaharashtraPolitics #DalitMuslimMaratha #SocialJustice #MaharashtraTransformation #UnitedForChange #MarathaMovement