गुजरातमध्ये एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आहे. इतकंच नव्हे, तर त्याने आपल्या आईचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आणि नंतर सॉरी आई, मी तुला मारलं असं म्हणत माफीही मागितली. हा प्रकार राजकोटचा आहे, जिथे मुलाने आईचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आईच्या शवासोबत इंस्टाग्रामवर फोटोही शेअर केला. हा प्रकार समोर आला तेव्हा एका स्थानिक रहिवाशाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाहिलं की आरोपी नीलेश गोसाई यूनिवर्सिटी रोडवर भगतसिंहजी गार्डनमध्ये आपल्या आईच्या शवाजवळ बसलेला आहे.
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, महिलेची ओळख 48 वर्षीय ज्योतिबेन गोसाई म्हणून झाली आहे.
पोलिसांनी नीलेशची चौकशी केली असता, त्याने लगेचच आपला गुन्हा कबूल केला.
त्याने सांगितले की, सुरुवातीला त्याने आपल्या आईवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पण ज्योतिबेन चाकू हिसकावून घेण्यात यशस्वी झाल्या, त्यानंतर नीलेशने चादरीने त्यांचा गळा आवळला.
आईची हत्या केल्यानंतर, त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला
आईची हत्या केल्यानंतर, त्याने इंस्टाग्रामवर आपल्या आईचा एक फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन दिले, “सॉरी आई, मी तुला मारलं, मला तुझी आठवण येते, ओम शांती.” एका दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “मी माझ्या आईला मारतो आहे, माझं जीवन संपवतो आहे, सॉरी आई, ओम शांती, मिस यू आई.” प्राथमिक तपासानुसार, ज्योतिबेन वर्षानुवर्षे गंभीर मानसिक आजाराशी झुंजत होत्या, ज्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या मुलाचा वारंवार वाद आणि माराहण देखिल होत असे.
वादाचे रूपांतर हत्येत
अहवालानुसार, घटनेच्या दिवशी नीलेश आणि त्याच्या आईमध्ये काहीतरी वाद झाला, ज्याचे रूपांतर नंतर तिच्या हत्येत झाले.
ज्योतिबेन यांचे लग्न 20 वर्षांपूर्वी तुटले होते आणि त्या नीलेशसोबतच राहत होत्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की,
त्यांचं मानसिक आरोग्य उपचार चालू होतं, पण घटनेच्या एक महिन्यापूर्वी त्यांनी औषध घेणं बंद केलं होतं, ज्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडली होती.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 31,2024 | 22:22 PM
WebTitle – Sorry Mom I Killed You Son kills mother in Gujarat then shares a photo on Instagram