मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने सहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. योजनेत आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना देखिल राबविण्यात येणार आहे. या योजनेनुसार, ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे सादरीकरणही करण्यात आले. या योजनेत पारदर्शकता आणि अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी काही नियमांमध्ये बदल केले गेले आहेत.लाडकी बहीण योजना लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम व शिथिलता करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल
राज्य सरकाराच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा आहे. नियमांत अनेक शिथिलता आणून महिलांना ही योजना सहजासहजी व सुलभरितीने मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही काही तांत्रिक अडचणी आणि कागदोपत्रांची पूर्तता अनुषंगाने काही बदल आवश्यक आहेत. त्यामुळे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली.
बैठकीत करण्यात आलेल्या 6 महत्त्वाच्या बदलांमध्ये हे नियम समाविष्ट आहेत
१.लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
२.परराज्यात जन्मलेल्या महिलेला महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असल्यास पतीच्या कागदपत्रांवरून योजनेचा लाभ मिळणार आहे.
३.लाडकी बहीण योजना साठी ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करुन दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे.
४.केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
५.नव विवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्यास पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
६.ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.
तत्काळ अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढून या बदलांची अंमलबजावणी सुरू करावी, असा निर्णय बैठकीत झाला.
15 ते 19 ऑगस्टला पहिला हफ्ता जमा होणार
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कागदपत्रांमध्ये आणखी शिथिलता देण्यात आली आहे. ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांना 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होईल.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 24,2024 | 08:30 AM
WebTitle – mukhyamantri-majhi-ladki-bahin-yojana-nave-niyam