पावसाची अपडेट: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत रिपरिप पावसाचे वातावरण होते. मात्र, शनिवारी पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असून, त्यामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका लोकल ट्रेन सेवेलाही बसला आहे. सध्या तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.
पावसाची अपडेट: मध्य रेल्वेवरील विलंब
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे बदलापूर, ठाणे आणि दादर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे भल्या पहाटे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. हार्बर मार्गावरील गाड्याही १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावरील गाड्याही १० ते १५ मिनिटे उशिराने स्थानकावर येत आहेत.
अंधेरी सब-वे जलमय
मुसळधार पावसामुळे अंधेरी सब-वे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम भागात मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.
शहरात ठिकठिकाणी पाणी साचले
मुंबईतील सखल भाग अंधेरी, दादर, परेल, लालबाग, हिंदमाता, चर्चगेट परिसरात मुळसधार पाऊस सुरू आहे. उपनगरातही पावसाचा जोर वाढल्याने सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भागांत रस्त्यांवर दीड ते दोन फूट पाणी साचले आहे.
पावसाची अपडेट: हवामान खात्याचा अंदाज
हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ३-४ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
20 जुलै, मुंबई ठाणे नवी मुंबई येथे गेल्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. रात्रीपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला. कुलाबा बाजूला सर्वाधिक 176 मिमी आणि इतर अनेक ठिकाणी 70-100 मिमी नोंदवले गेले
वीकेंडला त्यामुळे गर्दी होणार नाही, पण तरीही कृपया आयएमडी अपडेट्सवर लक्ष ठेवा.
कोकणात दरड कोसळली
सिंधुदुर्गातील करुळ घाटात दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.नव्याने बांधलेले संरक्षक कठडे सुद्धा तुटून गेले,दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
काल (१९.०७.२०२४) सकाळी ८ ते आज (२०.०७.२०२४) सकाळी ८ वाजेपर्यंत या २४ तासांच्या कालावधीत मुंबई महानगरात कोसळलेला सरासरी पाऊस
मुंबई शहर – ९१ मिमी.
➡️ पूर्व उपनगरे – ८७ मिमी.
➡️ पश्चिम उपनगरे – ९३ मिमी.
🗓️ २० जुलै २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती – सकाळी – ११:२८ वाजता – ४.२४ मीटर
ओहोटी – दुपारी – ०५:३३ वाजता – २.०२ मीटर
🌊 भरती – रात्री – ११:१८ वाजता – ३.६६ मीटर
ओहोटी – (उद्या – दि.२१.०७.२०२४) – पहाटे – ०५:१४ वाजता – ०.५० मीटर
🗓️ 20 July 2024
⛈️☔ Moderate to heavy rain in city and suburbs. Possibility of very heavy rain at isolated places.
🌊 High Tide – 11:28 hours – 4.24 Meter
Low Tide – 17:33 hours – 2.02 Meter
🌊 High Tide – 23:18 hours – 3.66 Meter
Low Tide – (Next Day – 21.07.2024) 05:14 hours – 0.50 Meter
कोल्हापूर जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (MM)
20/07/2024
1) कागल=19
2) गारगोटी-
3) हातकणंगले-25
4) गडहिंग्लज -20
5) राधानगरी-
6) आजरा-72
7) शिरोळ=0
8) शाहूवाडी-88
9) पन्हाळा=
10) गगनबावडा-74
11) चंदगड-104
सांगली जिल्हा
Sangli District RF 20.07.2024
Walva-4
Shirala-38
Atpadi-1
Palus-7
Kasbedigraj-11.4
Kokrud-45
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 20,2024 | 10:14 AM
WebTitle – Rain Update: Heavy rain wreaks havoc in Mumbai: Impact on traffic including local services