नवी दिल्ली : दिल्ली आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघड; 50 वर्षीय महिला डॉक्टरला अटक – दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका अवयव प्रत्यारोपण रॅकेटची माहिती दिली आहे. अवयव प्रत्यारोपणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव काढून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात बसवले जाते. पोलिसांनी दिल्लीतील एका मोठ्या खासगी रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरला अटक (delhi doctor arrested in kidney racket) केली आहे. पोलिसांनी सांगितले की ही महिला डॉक्टर बांगलादेश आणि भारतातील या गँगशी संबंधित आहे.
50 वर्षांच्या डॉक्टर विजया कुमारी सध्या रुग्णालयातून निलंबित आहेत. पोलिसांनी सांगितले की या रुग्णालयातून गँगसोबत काम करणाऱ्या त्या एकमेव डॉक्टर होत्या. त्यांनी 2021 ते 2023 पर्यंत नोएडातील एका खासगी रुग्णालयात सुमारे 15 ते 16 अवयव प्रत्यारोपण केले होते. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, बांगलादेशच्या रुग्णांना दिल्ली मध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी फूस लावून आणले जात होते. या किडनी रॅकेट गँगमध्ये, डॉक्टर विजया कुमारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे एक नेटवर्क असल्याची शक्यता आहे.
बनावट कागदपत्रे तयार केली
डॉक्टरव्यतिरिक्त, गेल्या महिन्यात 3 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये दावा केला गेला होता की अवयव दान करणारे आणि अवयव घेणारे (दोघेही बांगलादेशी) एकमेकांचे नातेवाईक आहेत. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की या बनावट कागदपत्रांची जप्ती करण्यात आली आहे.
विजया कुमारी वरिष्ठ सल्लागार आणि किडनी प्रत्यारोपण सर्जन आहेत.
सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यांनी दिल्लीतील खासगी रुग्णालयात एक कनिष्ठ डॉक्टर म्हणून काम सुरू केले होते.
नोएडातील खासगी रुग्णालयात त्या व्हिजिटिंग सल्लागार म्हणून काम करत होत्या.
या रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक सुनील बलियान यांनी सांगितले की, त्यांनी आणलेल्या रुग्णांचे प्रत्यारोपण करण्यात आले होते.
बलियान यांनी सांगितले की, त्यांनी गेल्या 3 महिन्यांत एक शस्त्रक्रिया केली होती.
रुग्णालयाचे म्हणणे काय आहे?
पोलिसांच्या कारवाईनंतर दिल्लीतील हॉस्पिटलने डॉक्टरला निलंबित केले.
रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की क्राइम ब्रांचने तपासाच्या संदर्भात त्यांच्याकडून काही माहिती मागितली होती.
ती दिली गेली आहे. त्यांनी सांगितले की ही कारवाई दुसऱ्या रुग्णालयात (नोएडातील) करण्यात आलेल्या प्रक्रियांशी संबंधित आहे,
प्रथमदृष्टीने याचा या रुग्णालयाशी काहीही संबंध नाही.
‘4 ते 5 लाखात किडनी’
सद्यस्थितीतल्या प्रकरणात 29 वर्षीय रसेलने कथितत: आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून संभाव्य दानदात्यांना आपल्या देशातून दिल्लीला बोलावले. रसेलच्या सहकाऱ्यांमध्ये बांगलादेशचे रहिवासी मोहम्मद सुमन मिया आणि इफ्ती तसेच त्रिपुराचे रहिवासी रतीश पाल यांचेही नाव आहे. वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने लिहिले की दान करणारे 4 ते 5 लाख रुपयात आपली किडनी देत होते. तर दुसरीकडे किडनी घेणाऱ्यांकडून 25 ते 30 लाख रुपये घेतले जात होते. इफ्तीला सोडून बाकी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 09,2024 | 22:30 PM
WebTitle – delhi doctor arrested in kidney racket