Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र सरकारकडून अर्थमंत्री अजित पवार यांच्या बजेटमध्ये जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ च्या लाभार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दोन महिने वाढवण्यात आली आहे. आता लाभार्थी महिला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ‘एक्स’ वर ट्वीट करत म्हटले, “मंगळवारी (२ जुलै) विधानसभा अधिवेशनात घोषणा करण्यात आली की, योजनेच्या प्रति लाभार्थी महिलांची प्रतिक्रिया आणि जन प्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने ही वेळ वाढवण्यात आली आहे. अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांना १५०० रुपये आर्थिक लाभ दिला जाईल.”
योजनेत करण्यात आलेले बदल
अजित पवार पुढे म्हणाले, “या योजनेच्या पात्रता निकषात म्हटले होते की लाभार्थ्यांना निवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता जर महिला लाभार्थ्यांकडे १५ वर्षांपूर्वीचे निवासी प्रमाणपत्र नसेल, तर रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र यापैकी एक असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेत पाच एकर शेती असण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. तसेच आता या योजनेत लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६० वर्षे ऐवजी २१ वर्षे ते ६५ वर्षे केले जात आहे.”
अर्थमंत्री म्हणाले, “जर परदेशात जन्म झालेल्या महिलेचे लग्न महाराष्ट्रातील रहिवासी पुरुषाशी झाले असेल, तर अशा परिस्थितीत तिच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. जर २.५ लाख रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर पिवळ्या आणि नारिंगी रेशन कार्डधारक कुटुंबांना उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ दिला जाईल.”
महिलांना किती मिळणार पैसे
या योजनेनुसार, महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे वर्षाचा हिशेब केला तर महिलांच्या खात्यात वर्षाला 18 हजार रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 या वयोगटातील विवाहित किंवा अविवाहित महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र पिवळं आणि केसरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे.
कुठे मिळेल योजनेचा अर्ज
राज्यातील सेतू कार्यालयं, तहसील कार्यालयं इथे अर्ज मिळवण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसतेय. ‘मुख्यमंत्री -माजी लाडकी बहिण योजना’ उपक्रमाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहेत. काळजीपूर्वक अर्ज भरून तो अर्ज आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आहे.
अर्जात कोणती माहिती भरायची?
अ ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना’ साठी अर्ज उपलब्ध झाला असून यात कोणती माहिती भरायची हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.अर्ज करणाऱ्या महिलेला नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाऊंट, जन्माचं ठिकाण इत्याही माहिती भरायची आहे. ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना’ अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यानुसार कोणती माहिती भरायची आहे ते पाहूयात…
‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना’ अर्ज
1) महिलेचे संपूर्ण नाव :
महिलेचे लग्नापूर्वीचे नाव :
महिलेचे लग्नानंतरचे नाव :
2) जन्म दिनांक : दिनांक/ महिना/वर्ष
3) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता :
4) जन्माचे ठिकाण :
जिल्हा-
गाव/शहर
ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका-
पिनकोड
5) मोबाईल क्रमांक :
6) आधार क्रमांक :
7) शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का?
होय/नाही. असल्यास, दरमहा रु.
8) वैवाहिक स्थिती
विवाहित/ घटस्फोटीत/ विधवा/ परितत्क्या/ निराधार
9) अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँक खात्याचा तपशील :
बँकेचे पूर्ण नाव
बँक खाते धारकाचे नाव
बँक खाते क्रमाक
IFSC कोड
10) आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय? होय किंवा नाही
11) Narishakti Prakar/नारीशक्ती प्रकार :
१) अंगणवाडी सेविका
२) अंगणवाडी मदतनीस
३) पर्यवेक्षिका
४) ग्रामसेवक
५) वार्ड अधिकारी
६) सेतू सुविधा केंद्र
६) सामान्य महिला
12) सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी,
१) आधार कार्ड
२) अधिवास/जन्म प्रमाणपत्र
३) उत्पन्न प्रमाणपत्र
४) अर्जदाराने हमीपत्र
५) बँक पासबुक
६) अर्जदाराचा फोटो
वरील माहिती गरजू व्यक्तींना नक्की पाठवा,ग्रुपमध्ये शेअर करा, किमान त्यांना मदत होऊ शकते.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 03,2024 | 20:42 PM
WebTitle – Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024