बीड : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या गावातील कुणाचीही कुणबी म्हणून जात नोंद नसल्याची बातमी मध्यंतरी आली होती.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती,मात्र मनोज जरांगे यांच्या तसेच गावातील इतरांच्या कुणबी जातीची नोंद अखेर सापडली आहे.जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडून यासंबंधीची पडताळणी सुरू होती.तेव्हा ही बाब समोर आली आहे.
मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी
मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्याकडून शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडे जातीची नोंद तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारी सुट्टी असतानाही दुपारी बारावाजल्यापासून कार्यालयाचे अधिकारी व सर्व कर्मचारी तसेच मोडी भाषा लिपी अभ्यासक डॉ.संतोष यादव, मराठा आरक्षण समितीचे समन्वयक डॉ. उद्धव घोडके हे संपूर्ण रेकॉर्डची तपासणी करत होते. १८८०च्या जनगणनेनुसार मातोरी येथे मनोज जरांगे यांच्या पूर्वजांची नोंद शासन दरबारी आढळून आल्याने मनोज जरांगे यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यात एकूण ५४ गावे असून, त्यापैकी ३४ गावांच्या नोंदी आतापर्यंत शोधण्यात आल्या आहेत. मातोरीसह बोरगाव चकला, तिंतरवणी आणि तरडगव्हाण या चार गावांची फेरतपासणी करत असताना मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडून आल्या आहेत.
मोडी लिपी जाणकार अभ्यासकांची गरज
आतापर्यंत मनोज जरांगे यांचे जन्मगाव असलेल्या मातोरीमध्ये नमुना नंबर ३३ आणि ३४ नुसार पडताळणी केली असता ७१ कुणबी नोंदी सापडून आल्या आहेत. तालुक्यात चार गावांमध्ये झालेल्या फेरतपासणीमध्ये जवळपास १५१ कुणबी नोंदी आढळून आल्या असून, सुट्टीच्या दिवशीदेखील फेरतपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांची वंशावळ सापडून आली ज्यामध्ये वडील रावसाहेब, लक्ष्मण, काशिनाथ म्हादुजी, गेणू आणि म्हातरबा अशा नोंदी आढळून आल्या आहेत. मोडी लिपीतील निजामकालीन नोंदी असल्यामुळे भाषा वाचण्यासाठी मोडी तज्ज्ञांची गरज भासणार आहे. शिवाय कागदपत्रेदेखील जीर्ण झाली आहेत. मोडी लिपी जाणकार असणाऱ्या वाचकांची संख्या वाढवण्यासाठी अभ्यासकांची गरज असून, शिंदे समितीसमोर हा विषय मांडला जाईल असे डॉ. यादव म्हणाले.
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, माझी कुणबी नोंद सापडली आहे.माझे वडिल तिथं गेले होते,
पण ते तिथं गेले की त्यांना तिकडे नेण्यात आलं होतं हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे,
मागील तीन चार दिवसांपासून माझ्याच प्रमाणपत्राची का चर्चा केली जातेय,
याची देखील शंका मला वाटायला लागली असल्याचे यावेळी मनोज जरांगे यांनी म्हणलं आहे.
माझ्यासहित सर्व मराठ्यांना जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हाच मी ही नोंद स्विकारेन, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
इतरही गावाच्या नोंदी सापडून आल्या – रावसाहेब जरांगे
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या गावातील कुणाचीही कुणबी म्हणून जात नोंद नसल्याची बातमी मध्यंतरी आली होती.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती,शिरुर तहसील कार्यालयामध्ये मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आढळून आल्याची माहिती मनोज जरांगे यांचे वडिल रावसाहेब जरांगे यांनी दिली आहे. फेरतपासणी करण्यासाठी तुम्ही आमच्या नोंदी पुन्हा तपासून घेऊ शकता.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे मनोज जरांगे यांना पत्र!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08,2024 | 09:51 AM
WebTitle – A record of Manoj Jarange being Kunbi was found