मुंबई : जमावाने मिळून एखाद्याची एकट्याला गाठून मॉब लिंचिंग करण्याचे धार्मिक दहशतवाद माजवण्याचे प्रकार आता मराठी माणसाच्या मुंबईत सुद्धा सुरू झाले आहेत.अशीच एक घटना काल मुंबईतील कांदिवली भागात घडली असून कामावरून घरी जाणाऱ्या मराठी तरुणाला रस्त्यात अडवून जय श्रीराम च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करण्यात आली.तसेच तरुणाला शिवीगाळ करत अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पीडित मराठी तरुणाने परप्रांतीय टोळक्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
जय श्रीराम म्हणायला लावत मुंबई मध्ये परप्रांतीय टोळक्याची मराठी तरुणाला जबर मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ किसन अंगुरे (34) हे 25/09/2023 रोजी कामावरून घरी जात होते.
गोकुळ नगर कांदिवली पूर्व मुंबई येथून घरी जात असताना परप्रांतीय टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवले.
त्यातील एकाने त्यांना “जय श्रीराम” बोल” नहीं तो मारुंगा” अशी धमकी दिली.अचानकपणे घडलेल्या या हल्ल्याने सिद्धार्थ अंगुरे हडबडले त्यांनी तसे करण्यास नकार दिला.
या टोळक्याने मग सिद्धार्थ यांना आई बहिणीवरून गलीच्छ शिवीगाळ केली,”मादxx भेxx तु जय श्रीराम बोल नहीं तो बहुत मारुंगा,तु कटवा है क्या?” त्याचवेळी या तिघांच्या टोळक्याने सिद्धार्थ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खाली पाडले.
यावेळी पीडित सिद्धार्थ अंगुरे यांचे भाऊ विष्णु आणि भाचा सुनिल यांनी या टोळक्याच्या मारहाणीपासून त्यांना वाचवले.
पीडित सिद्धार्थ अंगुरे यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली पश्चिम येथे उपचार करण्यात आले.
याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी सुरज तिवारी,अरुण पांडे,पंडित,राजेश रिक्षावाला
यांच्याविरोधात भांद. वि. कलम 341,504,323,506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत या अगोदरही जय श्रीराम ची घोषणा देण्याची जबरदस्ती करत मारहाण करण्यात आल्याची घटना बांद्रा येथे घडली होती.
मुंबई सारख्या शहरात अशाप्रकारच्या घटना घडणे ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
प्रसिद्ध होण्यासाठी लष्करातील जवानाला मित्राकडून मारहाण, पाठीवर ‘पीएफआय’ लिहिलं, आता कोठडीत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 27,2023 | 12 :13 PM
WebTitle – A Marathi youth was brutally beaten by a gang in Mumbai for forcing him to say Jai Shri Ram