भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा जोरदार प्रयत्न सर्वच पातळ्यांवर होतो आहे,तसेच काही ठिकाणी खाजगी ट्रेन चालवण्याची परवानगी देण्यात आली. तेजस ही देशातील अशीच पहिली खासगी ट्रेन आहे.मात्र आता रेल्वे अपघातांची मालिका सुद्धा सुरू झाली आहे.अशाच एका खासगी पॅंट्री डब्यातून बेकायदेशीरपणे सिलिंडर नेले जात असताना स्फोट होऊन रेल्वे ला आग लागली आणि यात दहा निष्पाप रेल्वे प्रवाशांचा जीव गेला.तर 20 जखमी असल्याची माहिती समोर आलीय. तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. रेल्वे स्थानकाच्या जवळ उभ्या असणाऱ्या रेल्वेच्या डब्याला ही आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यासोबतच या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही ट्रेन लखनौहून रामेश्वरमला जात होती, असे सांगण्यात येत आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची घटना पहाटे 5.15 च्या सुमारास मदुराई यार्ड जंक्शनवर थांबली असताना ही आग लागली.
ज्या डब्यात आग लागली तो डबा खासगी होता.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या डब्यात आग लागली तो डबा खासगी होता. नागरकोइल जंक्शन येथे शुक्रवारी हा डबा जोडण्यात आला होता. या डब्यात प्रवासी अवैधरित्या गॅस सिलिंडर घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. गॅस सिलेंडरमुळे डब्याला आग लागली. या खासगी डब्याशिवाय अन्य कोचचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशातील होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कोचमधील प्रवाशांनी 17 ऑगस्ट रोजी लखनऊ येथून प्रवास सुरू केला होता. ते उद्या (२७ ऑगस्ट) चेन्नईला जाणार होते. ते चेन्नईहून लखनौला परतणार होते.” ते म्हणाले की जेव्हा डबा उभा होता, तेव्हा काही प्रवासी चहा/नाश्ता करण्यासाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या एलपीजी सिलिंडरचा वापर करत होते, त्यामुळे डब्याला आग लागली. हे समजताच बहुतांश प्रवासी बाहेर पडले. डबा वेगळा होण्यापूर्वीच काही प्रवासी फलाटावर उतरले.
खासगी पार्टीच्या डब्यातील प्रवासी अवैधरित्या गॅस सिलिंडर घेऊन जात होते
मदुराई जंक्शन आगीबाबत रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. जे आहेत- 9360552608 आणि 8015681915.
खासगी पार्टीच्या डब्यातील प्रवासी अवैधरित्या गॅस सिलिंडर घेऊन जात होते आणि त्यामुळेच ही आग लागली.
आगीची माहिती मिळताच अनेक प्रवासी खासगी डब्यातून बाहेर पडले. काही प्रवासी फलाटावरच उतरले.
वाचकांच्या माहितीसाठी,IRCTC पोर्टल वापरून कोणीही पार्टी कोच बुक करू शकतो.
मात्र डब्यात गॅस सिलिंडर यासारखे ज्वलनशील पदार्थ सोबत नेण्याची परवानगी नसते.
असं असताना या प्रवाशांनी गॅस सिलिंडर सोबत कसा नेला?त्यांची तपासणी करण्यात आली नव्हती का असे प्रश्न उपस्थित होतात.
वारंवार होणाऱ्या रेल्वेचे अपघात आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे
रेल्वेने प्रवास करणे धोकादायक बनल्याचे नागरिक चर्चा करत असून खासगीकरण केल्यामुळे
प्रवाशांच्या जीविताशी खेळले जात असल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 26,2023 | 16:55 PM
WebTitle – Madurai railway private coach caught fire, 10 killed, 20 injured