Sambhaji Bhide Controversial Statement: नेहमीच काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करून समाजातील वातावरण दूषित करणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Shiv Pratistan President Sambhaji Bhide) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Shiv Pratistan President Sambhaji Bhide) यांच्यावर अलिकडे केलेल्या स्फोटक अन वादग्रस्त वक्तव्यावरून सर्व स्तरावरुन संताप व्यक्त केला जात असून त्यांच्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आले आहेत.त्यामुळे अटक होऊ नये म्हणून आता कार्यकर्त्याकडून अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
संभाजी भिडे यांना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावपळ
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटक अन वादग्रस्त वक्तव्यावरून सर्व स्तरावरुन संताप व्यक्त केला जात असून त्यांच्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आले आहेत.त्यामुळे अटक होऊ नये म्हणून आता कार्यकर्त्याकडून अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमधिल प्रसिद्ध वकिलांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आलीय.प्रसिद्ध वकिलाचा सल्ला घेऊन संभाजी भिडे यांना अटक होऊ नये म्हणून अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे नी दोनच दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले तसेच अमरावती मधिल राजापेठ पोलीस स्टेशनात सुद्धा गुन्हा नोंदविण्यात आलाय.
काँग्रेसकडून अमरावती शहरात शनिवारी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन
संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान चे कार्यकर्ते अमरावतीमधिल सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले.यावेळी भिडेंच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.काँग्रेसकडून अमरावती शहरात शनिवारी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली होती.त्यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे हे शहरातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला आहे. संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी यशोमती ठाकूर यांच्याविरोधातच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीय.
महात्मा गांधींच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य
संभाजी भिडे यांनी अमरावतीमधिल येथील एका कार्यक्रमात महात्मा गांधींच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
‘महात्मा गांधी यांचे पिता करमचंद गांधी हे नसून एक मुस्लीम जमीनदार होते.’, असं स्फोटक वक्तव्य करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती.त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्यातील सामाजिक अन राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यभरातून त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत टीका केली जात असून राज्यात ठिक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तसंच राज्यातील नागरिक संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी देखील करत आहेत.
तर ही वेळ आली नसती…
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा त्याचवेळी बंदोबस्त केला असता,तर ही वेळ आली नसती.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की,
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे ने महात्मा गांधी यांच्या विषयी केलेलं व्यक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ आली नसती.
संभाजी भिडे कृष्णा भास्कर कुलकर्णी चे वंशज
यशोमती ठाकूर यांनी म्हटलं की , “हा माणूस अतिशय घाणेरडा आहे. संभाजी भिडे ज्या भागात आहेत तिकडे आम्ही फोन लावला अन जाणून घेतलं की हा कसा माणूस आहे.त्यावेळी स्थानिक लोकांनी सांगितलं की, संभाजी भिडे अफजल खानाचा वकिल कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा वंशज आहे. म्हणजे हे वंशज कोणाचं,अन स्वत:च नाव काय ठेवतात, अन बोलतात काय. दुसरीकडं सरकार त्यांना मोकळे सोडून फिरू देतय.”
“संभाजी भिडेंचं देशासाठी काय योगदान?”
संभाजी भिडे यांनी पंडित नेहरूं यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर म्हणाल्या की,
“पंडित नेहरूंचं देशासाठी नखाइतकंही योगदान नाही असं संभाजी भिडे (मनोहर कुलकर्णी) म्हणतात, मग यांनी देशासाठी योगदान दिलंय का? नेहरू देशासाठी ११ वर्षे तुरुंगात होते. ११ वर्षे तुरुंगात असलेल्या व्यक्तिला हे असे कसे काय बोलू शकतात? ते युवकांची डोकी खराब करत आहेत. युवकांची पिढी खराब करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. हे आम्ही होऊ देणार नाही.”
राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल – देवेंद्र फडणवीस
रामदास आठवले म्हणाले की, “संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. गांधीजी स्वातंत्र्यसैनिक होते.
या वयात गांधीजींविरुद्ध असे विधान करणे संभाजींना शोभणारे नाही.
त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंवर कारवाई करावी असे मला वाटते.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.”संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. “गांधीजींच्या विरोधात असे वक्तव्य अयोग्य आहे, लोक ते खपवून घेणार नाहीत. याप्रकरणी राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. महात्मा गांधींचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असेही फडणविस म्हणाले.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 31,2023 | 11:28 AM
WebTitle – Sambhaji Bhide rushes to get pre-arrest bail