नुकतच चंद्रयान-3 Chandrayaan 3: लाँच करण्यात आलं. या लॉन्चिंगच्या निमित्ताने भारतासह जगभरातील लोक अभिमान आणि आनंदात बुडालेले दिसले. अनेकांनी भारत माता की जै चा नारा दिला.आपल्या सर्वांनाच यामुळे आनंद आणि अभिमान वाटणं साहजिकच आहे.हा गर्व करणारा क्षणच होता.मात्र, या मोहिमेसाठी लाँचिंग पॅडसह अनेक महत्त्वाची उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीच्या अभियंता-अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार वेतनच मिळालेले नाही,अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.चंद्रयानसह ISRO च्या सर्व मोठ्या उपग्रहांसाठी लॉन्चिंग पॅड बनवणाऱ्या HEC (हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन). कंपनीने त्यांच्या या कर्मचाऱ्यांना वेतनच दिलेलं नाही.
पगाराच्या मागणीसाठी कंपनीच्या अभियंते-कामगारांचं आंदोलन
न्यूज एजन्सी IANS ने वृत्त दिले आहे की रांचीमधील हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (HEC) च्या अभियंत्यांना गेल्या 17 महिन्यांपासून पगार दिला गेलेला नाही.अहवालात असंही म्हटलं आहे की पगार न देण्याची समस्या असूनही, कंपनीने मोबाइल लॉन्चिंग पॅड आणि इतर महत्त्वपूर्ण आणि जटिल उपकरणे डिसेंबर 2022 मध्ये शेड्यूलच्या आधी वितरित केली होती.पगाराच्या मागणीसाठी कंपनीच्या अभियंते-कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले, परंतु चंद्रयान-3 साठी इस्रोकडून मिळालेल्या कार्यादेशाची पूर्तता करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
एचईसी (HEC) कंपनी ने लॉन्चिंग पॅड, टॉवर क्रेनसह अनेक उपकरणे बनवली
HEC कर्मचाऱ्यांनी पगार नसतानाही मेहनतीने काम केले. त्यामुळे मोबाईल लॉन्चिंग पॅड आणि टॉवर क्रेन वेळेवर उपलब्ध झाली.फोल्डिंग कम वर्टिकल रिपोझिशन करण्यायोग्य प्लॅटफॉर्म आणि क्षैतिज सरकता दरवाजा व्यतिरिक्त, एक 6-अक्ष CNC डबल कॉलम वर्टिकल टर्निंग आणि बोरिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, कंपनीने 3-अॅक्सिस सीएनसी सिंगल कॉलम वर्टिकल टर्निंग आणि बोरिंग मशीनसह क्लिष्ट उपकरणे डिसेंबर 2022 मध्ये, वेळापत्रकाच्या आधी पुरवली आहेत.
HEC कर्मचाऱ्यांनी चंद्रयान च्या प्रक्षेपणाचा आनंद साजरा केला
शुक्रवारी दुपारी श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झालं
तेव्हा HEC कंपनीच्या या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी देखील हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण साजरा केला.
त्या सर्वांनी केक कापत टाळ्या वाजवत हा क्षण साजरा केला.
एचईसीकडे वर्क ऑर्डरची कमतरता नाही, भांडवलाची कमतरता
एचईसीकडे वर्क ऑर्डरची कमतरता नाही, परंतु खेळत्या भांडवलाच्या कमतरतेमुळे काम वेळेवर पूर्ण होत नाही आणि त्यामुळे कंपनीचे सतत नुकसान होत आहे. HEC ने अनेक वेळा अवजड उद्योग मंत्रालयाला एक हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे, परंतु केंद्र सरकार कारखान्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही, असे मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले होते. कंपनी व्यवस्थापनाला स्वत:च्या पायावर उभे राहावे लागेल.असं सरकारकडून सांगण्यात आलंय.
रांची मधिल धुर्वा येथे स्थित HEC कंपनी ही अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
आणि सर्व उद्योगांची जननी म्हणून त्याची ख्याती देशात आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून गंभीर खेळत्या भांडवलाच्या संकटाचा सामना करत असलेल्या एचईसीमध्ये
आजपर्यंत तीन हजारांहून अधिक अभियंते आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
1963 मध्ये सुमारे 22 हजार कर्मचाऱ्यांसह सुरू झालेल्या या कंपनीत आता केवळ 3400 कर्मचारी-अधिकारी आहेत.
कर्ज आणि बोजा इतका आहे की त्यांचे पगार देण्यास कंपनी पूर्णपणे सक्षम नाही.
गेल्या अडीच वर्षांपासून एचईसीमध्ये कायमस्वरूपी मुख्य प्रबंध निदेशक म्हणजे सीएमडीची नियुक्ती झालेली नाही.
मिताली शर्मा पोस्टिंग च्या पहिल्याच दिवशी लाच घेताना रंगेहात अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 17,2023 | 21:21 PM
WebTitle – The engineers making the Chandrayaan-3 launch pad have not been paid for 17 months