भोपाळ : मध्य प्रदेशातून एक रक्त खवळणारा धक्कादायक अन तितकाच मानवतेला काळीमा फासणारा लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पायऱ्यांवर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर लघवी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आणि प्रकरण मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाने राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे.त्याचबरोबर लघवी करणारी व्यक्ती भाजप आमदाराचा प्रतिनिधी असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या दाव्याबद्दल भाजप टाळाटाळ करत आहे.आदिवासी व्यक्तीवर लघवी करणाऱ्याचे नाव प्रवेश शुक्ला असल्याचे उघड झालेय.
आरोपी भाजपचा आमदार प्रतिनिधी
मात्र अमर उजालाच्या माहितीनुसार हा विकृत नराधम प्रवेश शुक्ला हा
सिधी विधानसभा आमदार पंडित केदारनाथ शुक्ला याचा माजी आमदार प्रतिनिधी असल्याचे कळते.भाजप मात्र हात वर करत आहे.
विकृत नराधम प्रवेश शुक्ला चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेश प्रमुख अरुण यादव यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना टोला लगावला आहे. शिवराज सिंह चौहान आणि नरोत्तम मिश्रा केवळ तोंडी खर्च करतात, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे लिहितात की भाजपच्या राजवटीत आदिवासी बांधवांचा कसा आदर केला जात आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी NSA लावण्याचे संकेत दिले
व्हायरल झालेल्या व्हिडिओची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे.
गुन्हेगाराला कोणत्याही किंमतीत सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कठोर कारवाई करावी. तसेच दोषीवर NSA लावण्यात यावा असे संकेत दिले आहेत.
यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे प्रवेश शुक्ला यांचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले की, या घटनेमुळे संपूर्ण मध्य प्रदेश लज्जाग्रस्त झाला आहे.
हा व्हिडिओ नऊ दिवसांपूर्वीचा आहे. सिधी जिल्ह्यातील कुबरीबाजार येथे एक आदिवासी गरीब तरुण बसला होता.प्रवेश शुक्ला याने त्यांच्यावर लघवी केली. अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला अन सगळेच हादरले.यावर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कुबरी गावचा रहिवासी असलेला प्रवेश शुक्ला हा अगोदर भाजपचा आमदार प्रतिनिधी होता. असे कळते,सध्या तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता देखील असल्याचे कळते. या संपूर्ण प्रकरणाबाबत अॅडिशनल एसपी सिद्धी अंजुलता पटले यांनी सांगितले की, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही तपास करत आहोत की या व्हिडिओमध्ये कोण आहे?
पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही
काँग्रेस नेते यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोपींना अटक न करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आमदाराचा प्रतिनिधी असल्यामुळेच पोलिस त्याला अटक करत नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.
मध्य प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष रामू टेकम यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध करताना म्हटले की,हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देशात माणुसकीच उरली नसल्याचे दिसते.ते म्हणाले की, भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला यांचे प्रतिनिधी आरोपी प्रवीण शुक्ला यांनी सिगारेट ओढत असताना ज्या प्रकारे गरीब आदिवासी तरुणाच्या अंगावर लघवी केली, यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.
कमलनाथ म्हणाले – मध्य प्रदेशला या घटनेची लाज वाटत आहे
माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, सिधी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणावर लघवी करण्याच्या क्रुरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी समाजातील तरुणांसोबत अशा घृणास्पद आणि पतित कृत्याला सुसंस्कृत समाजात स्थान नाही. लघवी करणारी व्यक्ती भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. आदिवासींवरील अन्यायअत्याचारात मध्यप्रदेश अगोदरच पहिल्या क्रमांकावर आहे. या घटनेने संपूर्ण मध्यप्रदेश लाजीरवाणा झाला आहे.लघवी करणारी व्यक्ती भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
आदिवासी अत्याचारात मध्य प्रदेश आधीच पहिल्या क्रमांकावर आहे. या घटनेने संपूर्ण मध्यप्रदेश लाजीरवाणा झाला आहे.
दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि मध्यप्रदेशातील आदिवासींवरील अत्याचार थांबवावेत, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे.
आरोपीला अटक नसताना आरोपी नशेत असल्याचे गोदी मिडियाला समजले?
काही गोदी मिडियाने हा विकृत नराधम नशेत असल्याचा शोध लावत तशा बातम्या सुरू केल्या आहेत.जर पोलिसांनी अटक केली नाही,आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क नाही,अशा परिस्थितीत गोदी मिडियाला कसं समजलं की हा नराधम विकृत दारू पिऊन आहे? हेही धक्कादायक आहे,नाही अजिबात नाही,भारतीय मिडियाची ही नेहमीची प्रॅक्टिस असते,गुन्हा करणारा विशिष्ट जातीचा असला की त्याला अटक न होता केवळ बातमीवरच क्लीनचिट देत त्याला वाचवले जाते,कधी माथेफिरू कधी टेंशन मध्ये असलेला नैराश्यग्रस्त (शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा) कधी नादान तर कधी वाट चुकलेला असे अनेक लेबल्स लावून त्याच्या गुन्ह्याला एकप्रकारे समर्थन आणि गुन्ह्यापासून सोडवणूक करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते.
तीन राज्याचा समान नागरी कायदा विरोध,आमदारांची घरे जाळली जातील
फ्रान्स का जळत आहे? 17 वर्षीय Nahel M नाहेल ला पोलिसांनी का मारलं?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 04 JULY 2023, 20:59 PM
WebTitle – Sidhi Viral Video Pravesh Shukla urinated on tribal person