“कम्म” ( कर्म ) म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्यांचा परिणाम ,
जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कम्म करतो आहे.जर नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच कि मनुष्य कुशल कम्म ( कर्म ) करतोय,भगवान बुद्ध केवळ कर्मा संबंधीच बोलत नाहीत तर ते ज्यांना कम्म नियम म्हणून ओळखतात त्या कम्म नियमांचे विवेचन करतात,ज्या प्रमाणे दिवसा मागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मा मागून त्याचे परिणाम येतात ,हा नियम आहे.
म्हणून भगवान बुद्धांचा उपदेश असा ,असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल,कारण कुशल काम्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते .
नमो बुद्धाय !!! अत्त दीप भव !!!
by कविता गवारे
विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे?
भगवान बुद्ध आणि विज्ञान यांचा संबंध आहे का? भगवान बुद्ध कालबाह्य आहे असं एके ठिकाणी वाचलं.बुद्ध कालबाह्य आहे का? मध्यंतरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच कुणीतरी बौद्ध धम्मातील वैज्ञानिक दृष्टिकोण काय? बुद्ध धम्मात विज्ञान आहे का? अशा पद्धतीची चर्चा घडवून आणली तिथं अनेकांनी टिंगल उडवली.याची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
बिग बँग थिअरी फार अलिकडची आहे.19 व्या शतकात म्हणजे १९३१ ला जॉर्ज लेमाइटर यांनी प्रथम एका महास्फोटाची संकल्पना मांडल्याचे दिसते.बिग बँग थिअरी आणि जॉर्ज लेमाइटर यांचं मत यात साम्य आहे.त्याला दुसरे शास्त्रज्ञ हबल यांनी दुजोरा दिला.हबल दुर्बिण आपण ऐकलं असेल या दुर्बिणचे नाव याच एडविन हबल यांच्या नावावरून देण्यात आलं आहे.
बिग बँग थिअरीनुसार, महास्फोट झाला. त्यानंतर प्रचंड प्रमाणावर ऊर्जा निर्माण झाली.त्यावेळी वातावरणात तापमान जवळपास पाच अब्ज अंश सेल्सिअस एवढे होतं. या ऊर्जेतून अनेक घटक बाहेर पडत होते. प्रसरणामुळे थंड होऊन त्यातून न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांसारखे अतिसूक्ष्म कण तयार झाले. विश्व पुरेसे थंड झाल्यानंतर या अतिसूक्ष्म कणांपासून प्रभाररहीत अणू तयार झाले. प्रसरण पावणाऱ्या घटकांवर गुरुत्वीय बलाचा परिणाम होऊन ते एकत्र येऊ लागले आणि त्यांचे पुंजके तयार झाले. त्यातूनच तारे, ग्रह, आकाशगंगा यांचा जन्म झाला. महास्फोटानंतर तयार झालेल्या हायड्रोजनचा वापर करून आजही नवीन तारे जन्म घेतात.
पुर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे?
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
हे ही वाचा.. बुद्ध पौर्णिमा हिंदू तिथी पंचांगाप्रमाणे येते का?
काय पिंपळ दिवस रात्र हवेत प्राणवायू सोडतो ?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 5, 2021 17:30 PM
Web Title – Theory of Karma