प्रधानमंत्री नरेंद्र मोदी Narendra Modi meets Elon Musk यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर एलन मस्क ने ट्विटरचे सहसंस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी (jack Dorsey) यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मस्क म्हणाले की ते संपूर्ण पृथ्वीवर अमेरिकेचे नियम लागू करू शकत नाहीत. स्थानिक सरकारांचे पालन करण्याशिवाय ट्विटरकडे पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी भारत सरकारने ट्विटरवर दबाव आणल्याचे जॅक डोर्सी ने म्हटले होते.
इंडिया टुडेशी संबंधित मोहन यांनी एलन मस्क यांना जॅक डोर्सीच्या विधानावर प्रश्न विचारला होता,यावर एलोन मस्क ने उत्तर दिलंय
“स्थानिक सरकारांच्या आदेशाचे पालन करण्याशिवाय ट्विटरकडे पर्याय नव्हता. आम्ही स्थानिक कायद्यांचे पालन न केल्यास, कंपनी बंद केली जाईल.मात्र आम्ही नियमांनुसार मुक्त भाषण देण्याचा प्रयत्न करू.”
माजी ट्विटर सीईओ जॅक डोर्सी काय म्हणाले?
जॅक डोर्सी म्हणाले होते की, शेतकरी आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदी सरकारने ट्विटरवर दबाव आणला होता.इतकच नाही तर त्यांनी दावा केला की, या शेतकरी आंदोलन चळवळीला कव्हर करणारी आणि या मुद्द्यावर सरकारवर टीका करणारी ट्विटर खाती बंद करण्यासाठी सरकारकडून ट्विटरला अनेक वेळा “विनंती” करण्यात आली होती.तसे न केल्यास भारतातील ट्विटर संचालन बंद करण्यात येईल तसेच ट्विटर कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले जातील, अशी धमकीही मोदी सरकारने दिली होती. भाजप सरकारने डोर्सीचा हा दावा फेटाळला.तर दुसरीकडे विरोधकांनी ही लोकशाहीची सुनियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे.
टेस्ला भारतात येणार?
मस्क यांनी इंडिया टुडेला सांगितले की, टेस्ला भारतात गुंतवणूक करणार आहे. मस्कने सांगितले की,
तो लवकरच भारतात येणार आहे. एलन मस्क म्हणाला,प्रधानमंत्री मोदी याना भारतासाठी योग्य गोष्टी करायच्या आहेत.
ते उघडपणे नवीन कंपन्यांना पाठिंबा देऊ इच्छितात आणि ते भारतासाठी फायदेशीर आहे याची खात्री करू इच्छितात.
आम्ही स्टारलिंक भारतातही आणण्यास उत्सुक आहोत.
मला वाटते की स्टारलिंक इंटरनेट भारतातील दुर्गम ग्रामीण भागांसाठी उपयुक्त ठरू शकते.
Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर आता धार्मिक प्रतिक?
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 21 JUN 2023, 13:00 PM
WebTitle – Narendra Modi and Elon Musk meet Government pressured-Jack Dorsey