Maharashtra BJP: डोंबिवलीत एक खळबजनक प्रकार उघडकीस आला आहे.भाजपा (BJP) पदाधिकारी असणाऱ्या नेत्याची आपल्याच पक्षातील पदाधिकारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत सतत मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,इतकच नाहीतर महिलेला ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे आरोप आहेत.या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात (Manpada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला,मात्र त्यानंतर भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांच्यात या प्रकरणावरून खडाजंगी झाली असून.एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत फुट पडल्याचे स्पष्ट झाले.करून घेतला आहे.सदर गुन्हा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या (Shiv Sena Shinde Faction) दबावाखाली नोंदविण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.याच कारणामुळे आता भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. भाजप पदाधिकाऱ्याच्या विरोधात केले गेलेले आरोपे हे खोटे असल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
भाजप नेत्याची पक्षातील महिलेकडे शरीरसुखाची मागणी
भाजपने नारा दिलेला बेटी बचाव बेटी पढाओ मात्र देशातील परिस्थिती काय आहे हे जनतेला देखील माहित आहेच,अन खुद्द भाजपचं महिला सुरक्षेच्या संदर्भातील धोरण काय हे कुलदीप सिंग सेंगर पासून ब्रिजभूषण सिंग पर्यंत देशातील जनतेने अनुभवले आहे.त्यामुळे भाजप पक्षातच महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.इतकच नाहीतर या महिलेवर घडलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवला जाणे बाजूला मात्र, आरोपच खोटे आहेत म्हणत मोर्चा काढत गुन्हा नोंद करणाऱ्या सीनियर पीआय यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली.त्यामुळे भाजपचे महिला धोरण नेमकं कसं आहे हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या..
सदर पीडित महिला ही डोंबिवली येथे गेल्या पाच वर्षांपासून भाजप ग्रामीण मंडळवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.
या महिलेकडे भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ चे अध्यक्ष नंदू जोशी यांनी सतत शारीरिकसुखाची मागणी केल्याचा गौप्यस्फोट
या पीडित भाजप महिला कार्यकर्त्यांनी केल्यानंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली.
सदर पीडित महिला या 48 वर्षांच्या असून त्या एका पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत.दोघा पती पत्नी मध्ये गेल्या काही वर्षापासून वाद सुरू असून त्यामुळे दोघेही वेगळे होत स्वतंत्र राहत आहेत.दरम्यान गेल्या पाच वर्षापासून या महिला भाजपसाठी डोंबिवली क्षेत्र मध्ये काम करत आहेत.याच संधीचा फायदा घेत डोंबिवलीतील भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी याने पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे सदर पीडित महिलेकडून यापूर्वीही अनेकदा नंदू जोशी विषयी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे तसेच भाजपच्या जिल्हा अध्यक्षांकडे तक्रारी केल्या करण्यात आल्या होत्या.पोलिसांकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या.मात्र त्यावेळी स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता. पोलीसांकडून तसेच भाजप पदाधिकाऱ्यांकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने इकडे नंदू जोशी ची हिंमत वाढली. त्यामुळे कंटाळून अखेर पीडित महिलेने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात भाजपचा मोर्चा
पीडित महिलेने मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी सतत हेलपाटे मारले. मात्र, नंदू जोशी हा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा जवळचा समर्थक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केलं होतं.अखेर मानपाडा येथील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पीडित महिला भाजपा कार्यकर्तीची सत्यता जाणून घेतल्यानंतर कोणत्याही दबावाला बळी न पडता नंदू जोशीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र,गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. अन दाखल झालेला गुन्हा हा खोटा असल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्याच विरोधात गुन्हा नोंद केला म्हणून चक्क मोर्चा काढला.पोलिसांना गुन्हा नोंद करायला शिंदे गट शिवसेना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असून जोपर्यंत पोलीस निरीक्षक बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिंदे गट शिवसेना यांचं काम करायचं नाही असा ठराव भाजपच्या बैठकीत पास करण्यात आला आहे.
पीडित महिलेचा आरोप – जीवे मारण्याची धमकी
पीडितमहिलेने गुन्हा दाखल करून सात ते आठ दिवस झालेले आहेत. तरीही अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होताच तुला जीवे ठार मारणार असल्याची धमकी
आरोपी नंदू जोशी याने दिली असल्याचा धक्कादायक अन गंभीर आरोप पीडित महिलेने केलाय.
त्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय. त्यामुळे पोलिसांनी लवकरातलवकर नंदू जोशी ला अटक करावी,
अशी मागणी पीडित महिलेनं केलीय,दरम्यान, या प्रकरणांवर बोलण्यास पोलिसांनी नकार दिलाय.
श्रीकांत शिंदे यांचा राजीनामा देण्याचा भाजपला इशारा
भाजपने सदर प्रकरणी शिंदे गटाच्या दबावाने गुन्हा नोंद झाल्याचा आरोप करत स्थानिक पातळीवर काम करणार नसल्याचा ठराव केल्याने युतीत मिठाचा खडा पडला आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र अन खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय की, कुठल्यातरी क्षुल्लक कारणावरून,कुठल्यातरी सीनियर पीआयवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे ठराव करतात की सेनेला सपोर्ट करायचा नाही,त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू ,अशी आव्हाने करणं हे आपण विचारपूर्वक केली पाहिजेत.आम्हाला आव्हान देण्याचं काम या लोकांनी करू नये.क्षुल्लक कारणावरून युतीत मिठाचा खडा टाकण्याचा काम करू नये.मला कोणताही स्वार्थ नाही,मला जर सांगितलं की कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या तर मी उद्या राजीनामा देईन.
विरोधक भानावर नाहीत.
एवढं प्रकरण घडूनही विरोधक देखील भानावर नसल्याचे समोर आले असून सत्ताधारी पक्षाला जाब विचारणे कोंडी करणे हे राजकीय डावपेच सोडा महिलेला न्याय मिळाला पाहिजे. सुरक्षा झाली पाहिजे असेही विरोधी पक्षातील एकही नेत्याला वाटू नये? यावर कुणीही प्रतिक्रिया दिल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
चित्रा वाघ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार ट्विटर वाद
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 10, JUN 2023, 11:20 AM
WebTitle – BJP leader’s nandu joshi demand for physical comfort from a woman ; threat to kill her