गुजरात: 21 व्या शतकात आपण AI मॉडेल डिजिटल युग इत्यादी आधुनिक गोष्टींवर चर्चा करत असताना दुसरीकडे आपल्या देशातील तथाकथित उच्च जातीय मेंदू नासलेले डोक्याने एवढे अधु आहेत की,आपल्याच धर्मातील दलित व्यक्तीने चांगले कपडे घातले,घोड्यावर बसले,चांगलं घर बांधलं तरी त्यांना बघवत नाही,पोटात मुरडा उठतो.जात मातीत जाते,अप्रतिष्ठा होते,खरंतर हा भयंकर मानसिक आजार आहे,एड्स कोरोना पेक्षाही भयंकर.अशीच एक घटना गुजरात मध्ये घडलीय,दलित तरुण गॉगल लावतो;जातीयवाद्यांकडून मारहाण करण्यात आलीय.एका हिंदू-दलित तरुणाने उन्हापासून संरक्षण होण्यासाठी काळ्या रंगाचा गॉगल लावला तर जातीयवादी मनुवादी पिलावळ खवळली,लै उडायला लागला का? असं म्हणून त्याला मारहाण करण्यात आली,इतकच नाहीतर वाचवायला आलेल्या पीडित तरुणाच्या आईचा विनयभंग करत मारहाण करत तिचे कपडे फाडले गेले.गुन्हा दाखल झालाय मात्र अद्याप कुणाला अटक झालेली नाही.
गुजरात दलित तरुण मारहाण काय आहे प्रकरण ?
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हे प्रकरण बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर तालुक्यातील मोटा गावाशी संबंधित आहे.
जिगर शेखलिया (21) असे पीडित तरुणाचे नाव आहे.
जिगरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी 30 मे रोजी सकाळी तो घराबाहेर उभा होता.
त्यानंतर एक आरोपी त्याच्याकडे आला, त्याने जिगरला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
जिगरने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, आरोपीने शिवीगाळ करत म्हटलं की, ‘आजकाल तू खूप उंच उडायला लागला आहेस.’
(‘तुम आजकल बहुत ऊंचा उड़ने लगे हो.’)
वाचवण्यासाठी आलेल्या आईला मारहाण
जिगरने सांगितले की, त्याच रात्री तो मंदिराबाहेर उभा असताना लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या सहा आरोपींनी जिगरला पुन्हा धमकावत म्हटलं की तो चांगले कपडे आणि सनग्लासेस (गॉगल) का घालतो. त्यानंतर या जातीयवादी गावगुंडांनी जिगरला मारहाण करण्यास सुरुवात केली. जिगरच्या म्हणण्यानुसार त्याची आई सीताबेन त्याला वाचवण्यासाठी आली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, जिगरच्या तक्रारीत त्याने आई सीताबेनचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. यादरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पीडित तरुण जिगरच्या आईचा ब्लाउज फाटला असल्याचे म्हटले आहे.
सध्या पीडित तरुण जिगर आणि त्याची आई सीताबेन वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दंगल, बेकायदेशीरपणे एकत्र येणे, महिलेचा विनयभंग करणे, दुखापत करणे, अपशब्द वापरणे
अशा विविध कलमांखाली गढ पोलिस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याशी संबंधित कलमेही जोडण्यात आली आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, धुरसिंग चेहरसिंग राजपूत, भरतसिंग खुमानसिंग राजपूत, सुरेशसिंग रणजितसिंग राजपूत, जयदीपसिंग चमनसिंग राजपूत, भगवानसिंग लक्ष्मणसिंग राजपूत, जगतसिंग लक्ष्मणसिंग राजपूत आणि प्रदीप अशी आरोपींची नावे आहेत. सिंह धुरसिंग राजपूत.अशी जातीयवादी गावगुंड आरोपींची नावे असून हे वृत्त लिहेपर्यंत कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
वंचित च्या शाखामहासचिव अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 03, JUN 2023, 12:56 PM
WebTitle – Dalit youth beaten for wearing sunglasses and good clothes.