डॉ. आंबेडकर रोड, ठाणे(प) या ठाणे शहरातील सर्वांत जुनी अशा गांवठाण वसाहतीला १०० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रित्यर्थ येथील रहिवाशी प्रदिप तुळशीदास सावंत व सुशांत पांडुरंग गायकवाड या नवोदित लेखकांनी लेखन व संकलन केलेल्या ‘स्थलांतर ते स्थित्यंतर’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.२० मे २०२३ रोजी सायं ६.०० वा. ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कै. वा. अ. रेगे सभागृहात ठाणे जिल्ह्यातील व शहरातील शेकडो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षोल्हासात साजरा झाला.
स्थलांतर ते स्थित्यंतर
या ग्रंथाचे प्रकाशन प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक व लेणी संवर्धन चळवळीचे प्रवर्तक, सुप्रसिद्ध डॉ. अतुल भोसेकर यांचे हस्ते संपन्न झाले. स्थलांतर ते स्थित्यंतर ग्रंथाची प्रस्तावना आंबेडकरी चळवळीतील प्रथितयश, सिद्धहस्त लेखक,कवी प्रा. दामोदर मोरे (मराठी भाषा विभाग, जोशी बेडेकर कॉलेज ठाणे) यांनी लिहिली असून, या ग्रंथातील विषयांच्या मांडणी प्रा.डॉ.गिरिश मोरे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी केल्या आहेत, तर या ग्रंथाचे साहित्यिक परिक्षण प्रा. विजय कृ. मोहिते (सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई ) यांनी केले आहे. या ग्रंथाचे मुद्रित शोधन मिलिंद धुमाळे (संपादक-जागल्या भारत, मुंबई ) यांनी केले आहे.
हा ग्रंथात आंबेडकरपूर्व व समकालीन चळवळीतील ज्येष्ठ नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वयोवृद्ध सहकारी, महाड क्रांती चवदार तळे संगराचे प्रमुख शिलेदार व डॉ.आंबेडकर रोड,ठाणे (प) या गांवठाण वसाहतीचे जनक समाजनायक शिवराम गोपाळ जाधवबाबा यांच्या कार्याला समर्पित असे लेखन शब्दबद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथात समकालीन व आंबेडकरोत्तर काळातील ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कर्मयोगी तुळशीराम शिवराम धोत्रे गुरुजी आणि त्यांचे समकालीन झुंजार सहकारी यांच्या सामाजिक जीवनावर आधारित लेखन केलेले आहे.
या ३०० पानांच्या ग्रंथात शिवराम गोपाळ जाधव ते धोत्रे गुरुजी, त्यांचे समकालीन सहकारी आणि त्यांच्या मृत्युप्रश्चात या वसाहतीतुन उदयास आलेली नेतृत्वे आणि क्रांती विरांगना महिलांच्या संघर्ष कथा व त्यांच्या ठाणे जिल्ह्याच्या चळवळीतील सामाजिक जीवनपटावर लेखन केले आहे. या ग्रंथात तीन वेगवेगळ्या कालखंडामध्ये या वसाहतीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक चळवळींचे विश्लेषण करण्यात आले आहे.
या प्रकाशन सोहळ्यास आयु. प्रताप जी. पाटील ( सेवानिवृत्त विक्रीकर सहाय्यक आयुक्त)
प्रभाकर एम.थोरात ( माजी डेप्युटी कलेक्टर, ठाणे) प्रकाश रवीराव (सहाय्यक संचालक,नगर रचना,ठाणे)
सुभाष तु. धोत्रे ( लेखक, कवि, समिक्षक) डॉ. मिलिंद रा. उबाळे MD ( प्रोफे. सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ,राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कळवा)
मदन ग. वाघचौडे (कार्यकारी अभियंता न.मुं.म.पा) श्रीमती. राजश्री रमेश पंडीत (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या)
सुरेन्द्र वि. महाडिक ( वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते) ॲड. राजय य. गायकवाड व ॲड. प्रज्ञेश चै. सोनवणे
(सामाजिक कार्यकर्ते / सुप्रसिद्ध कायदेतज्ञ) यांची उपस्थिती व वक्तव्ये लाभली.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुनिल अ. भालेराव (संघटक N.N.F./ डिव्ही.डायरेक्टर वोल्टास प्रा.लि.) यांनी भुषविले.
स्थलांतर ते स्थित्यंतर ग्रंथाचे प्रकाशन नॕशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशन (रजि) या सामाजिक संस्थेद्वारे करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे सूत्र संचालन प्रदिप तु. सावंत यांनी, तर प्रमोद के. भोजने यांनी सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुशांत पां. गायकवाड यांनी केले.
सदर ऐतिहासिक सोहळ्यास ठाण्यातील अपर कामगार आयुक्त ,कोकण शिरिन संजु लोखंडे मॕडम यांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रस्तुत ग्रंथ हा सवलतीच्या दरात रु. ३००/- फक्त या रकमेत प्रदिप तु. सावंत यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. (मो. नं.+91 99678 47523) तरी सर्वांनी हा ग्रंथ विकत घ्यावा.असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ऊसतोड मजुरांच्या जगण्याचा मागोवा घेणारी ‘यसन’
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 23, MAY 2023, 08:30 AM
WebTitle – Migration to transition sthalantar te sthityantar