भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे स्वीय सचिव असल्याचे दाखवून आमदारांना मंत्री करण्याची ऑफर देणाऱ्या गुजरातमधील ठगाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. सदर इसम स्वतःला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पीए सांगून मंत्री बनवण्याच्या नावाखाली आमदारांकडून पैशांची मागणी करत होता. याबाबत नागपूर सेंट्रलचे विकास कुमार यांनी पोलिसांत तक्रार केली होती. नागपूर पोलिसांनी या गुंडाला अहमदाबादमधील मोरबी येथून अटक केली आहे. नीरज सिंह राठौर याला पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरकर आमदाराला मंत्रीपद देऊ करण्याची ऑफर
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे खाजगी सचिव म्हणवून घेणारा हा व्यक्ती आमदारांना सांगत असे की, महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्यामुळे नवीन चेहऱ्यांची निवड केली जात आहे. असे सांगून ते आमदारांच्या संपर्कात होते. हा तोतया पीए नागपूरचे आमदार विकास कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर यांच्या संपर्कात होता. कुंभारे यांना मंत्री करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती. फोन करणारा ठग असल्याचे आमदार विकास कुंभारे यांना लक्षात आलं.
कुंभारे यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन तक्रार केली. अमितेश कुमार यांनी तात्काळ नीरजचे कॉल डिटेल्स शोधून लोकेशन शोधण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्याने अनेक आमदारांना अशाचप्रकारे फोन केल्याचे उघडकीस आले आहे. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि नंदुरबारचे आमदार राजेश पाडवी यांच्याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील विकास कुंभारे आणि टेकचंद सावरकर यांनाही असेच फोन केले असल्याची माहिती समोर आली आहे.
गोवा, नागालँडच्या आमदारांशीही संपर्क साधला
ही व्यक्ती महाराष्ट्राव्यतिरिक्त गोवा, नागालँडमधील 2 आमदारांच्या संपर्कात होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
आरोपी महाराष्ट्रातील चार, गोवा आणि नागालँडमधील दोन आमदारांच्या संपर्कात होता.
या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पक्षनिधीच्या नावावर करोडोंची मागणी
स्वत:ला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे स्वीय सचिव (पीए) म्हणवून घेणाऱ्या ठग नीरज सिंह राठौर याने
आमदारांना मंत्री करण्यासाठी पक्षनिधीच्या नावाखाली अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती.
त्यांनी आमदार विकास कुंभारे यांना तीन वेळा, तर टेकचंद सावरकर यांना एकदा फोन केला.
नागपूर पोलिसांनी आरोपीला नागपुरात आणले असून त्याची चौकशी सुरू आहे.
नकली जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करून दिली
कुंभारे यांना मंत्रिपदाच्या बदल्यात पक्ष निधीसाठी पैसे देण्याची उत्सुकता नीरज याने प्रत्येक फोन कॉलमध्ये व्यक्त केली होती.पक्षनिधी देण्यावर त्याचा भर राहिला.आमदारांनी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा, म्हणून त्याने त्याच्या साथीदारास जेपी नड्डा असल्याचे भासवत आमदारांशी बोलण्यास सांगितले.
समीर वानखेडे ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी खंडणी अन भाजप चे दोन मोहरे ?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 17, MAY 2023, 12:14 PM
WebTitle – posing as a JP Nadda PA, a person trying to cheat BJP MLA