युगांडा : पोलिसाने केलेला जीवघेणा गोळीबार सिसिटीव्ही मध्ये कैद झाला आहे,यात एक भारतीय ठार झाल्याचे समजते.67029 पोलीस कॉन्स्टेबल इव्हान वाबवायर Police Constable Ivan Wabwire Uganda अशी या माथेफिरु पोलीस अधिकाऱ्याची ओळख समोर आलीय, भारतीय नागरिक आणि TFS फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक, उत्तम भंडारी यांना कंपाला येथे गोळ्या घालून ठार मारल्यानंतर हा पोलिस पळून गेला आहे.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसाचा गोळीबार कैद;भारतीय ठार
इव्हान वाबवायर चा उत्तम भंडारी यांच्याशी कंपनीच्या देय रकमेवरून वाद झाला,कथितरित्या फुगवलेला आकडा इव्हान वाबवायर ने फेटाळला.आणि त्यानंतर त्याने त्याच्या AK47 ने ऑफिसमध्ये बसलेल्या उत्तम भंडारी यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. यामुळे उत्तम भंडारी जागेवरच कोसळले.ही घटना ऑफिसच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
गोळीबारानंतर, इव्हान वाबवायरने बाईकवरून घटनास्थळावरून पळ काढला आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बंदूक टाकून पळून गेला.
तपास सुरू असताना भंडारी यांचा मृतदेह मुळागो शहरातील शवागारात नेण्यात आला आहे.
कर्जाच्या हप्त्यावरून हत्या?
कंपाला मेट्रोपॉलिटन पोलिसांचे प्रवक्ते, पॅट्रिक ओन्यांगो यांनी स्पष्ट केले की पोलीस कॉन्स्टेबल इव्हान वाबवायर Police Constable Ivan Wabwire Uganda 2020 पासून दोन कर्जे फेडत आहे.पहिल्या कर्जाचा हप्ता थेट त्याच्या पगारातून कापलेला जात होता तर दुसऱ्या कर्जाचा हप्ता कापला जात नव्हता. त्याने कंपनीचे किती देणे आहे याची पडताळणी करण्यासाठी TFS फायनान्शियल सर्व्हिसेसच्या डायरेक्टरची भेट घेतली तेव्हा त्याला सांगण्यात आले की त्याच्याकडे Shs2,130,000 चे कर्ज आहे.भारतीय मूल्य 47 हजार रुपये.तथापि, इव्हान वाबवायरने कथितरित्या हा आकडा फुगलेला असल्याचे म्हणत फेटाळून लावले आणि जेव्हा त्याला रक्कम सांगितली गेली तेव्हा तो नाराज झाला आणि वाद घालू लागला.
कार्यालयात उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार,
इव्हान वाबवायर ने कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर गोळी झाडली आणि आतील सर्वजण बाहेर पडले.
गोळीबारामागील हेतू अद्याप अज्ञात आहे.
पोलिस उपमहानिरीक्षक, मेजर जनरल जेफ्री तुमुसिमे कात्सिगाझी यांनी
आज युगांडामध्ये राहणाऱ्या भारतीय व्यापारी समुदायाची भेट घेऊन त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली.
ही बैठक गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली.
दलित नवरदेव घोडी वर वरात; जातीयवाद्यांनी केली मारहाण
चर्मकार पोराने स्वतःच्या घरावर लावली बाबासाहेबांची सही
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on 13,MAY 2023, 13:30 PM
WebTitle – An Uganda policeman fired an Indian moneylender