तिरुवनंतपुरम : ‘द केरळ स्टोरी’ The Kerala Story या आगामी चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, एका प्रमुख राज्य पक्षाच्या युवा शाखा आणि इतर दोन व्यक्तींनी स्वतंत्रपणे चित्रपटाची कथा खरी असल्याचे सिद्ध केल्यास वस्तुस्थिती मांडणाऱ्यांना रोख बक्षीस देण्याचे वचन दिले आहे. अदा शर्मा स्टारर चित्रपट, 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे, असा दावा केला आहे की केरळमधून सुमारे 32,000 महिला बेपत्ता झाल्या आहेत, त्यांचे ब्रेनवॉश करून धर्मांतरित केले गेले आणि त्यांना परदेशात दहशतवादी मोहिमांमध्ये पाठवले गेले.
The Kerala Story ही कथा खरी असल्याचे सिद्ध केल्यास एक कोटी रुपये
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे दुसरे मोठे सदस्य, आययूएमएलची युवा शाखा, मुस्लिम युथ लीगचे प्रमुख पी.के.फिरोज यांनी आव्हान डिले आहे की, जर The Kerala Story चित्रपटाचे निर्माते ही कथा खरी असल्याचे सिद्ध करू शकले तर ते त्यांना एक कोटी रुपये देतील.
दुसरी घोषणा ब्लॉगर के.नाझीर हुसेन कडून करण्यात आलीय.महिलांचे धर्मांतर करून त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यास भाग पाडल्याचा पुरावा जो कोणी देऊ शकेल त्याला मी 10 लाख रुपये देईन, असे त्यांनी जाहीर केलं आहे.
एक वकील आणि अभिनेता असलेल्या शुक्कूरने फेसबुकवरून आव्हान देत जाहीर केलंय की,
धर्मांतरित होऊन इस्लामिक स्टेटमध्ये सामील झालेल्या केरळमधील महिलांचे नाव सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो ११ लाख रुपये देण्यात येतील.
The Kerala Story चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सत्ताधारी सीपीआय-एम प्रणित डावे आणि यूडीएफने चित्रपट प्रदर्शित करू नये,
अशी मागणी केली. केरळचे सांस्कृतिक मंत्री साजी चेरियन म्हणाले की,
‘द केरळ स्टोरी’ दाखवली तर लोकांनी बहिष्कार टाकावा.कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटलंय.
चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे.
यात केरळमधील चार महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा प्रवास आहे ज्या इस्लामिक स्टेटचा भाग बनल्या आहेत.
या चित्रपटात योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्याही भूमिका आहेत.
याची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत
आई कर्ज फेडू शकली नाही; 30 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षाच्या मुलीशी लग्न
कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 02 ,2023 09:36 AM
WebTitle – If the story of The Kerala Story is proved to be true, a reward of crores of rupees