जयसिंगपूर-दि.13 व दि 14 रोजी सावळा मास्तर स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचारमंच व प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने गोठणेगाव वसाहत,दानोळी-जैनापूर ता.शिरोळ या ठिकाणी बुद्ध विहारचे उदघाटन व बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना हा समारंभ आणि क्रांतिसूर्य जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली.सदर दोन्ही कार्यक्रमात धरणग्रस्तांचे वसाहतीमधील व शिरोळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्त बौद्ध,मुस्लिम,ख्रिश्चन,धनगर,मराठा व ओबीसी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी गुरुवार दि.13 रोजी बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक कार्यक्रमाला सुरुवात करणेत आली.यावेळी आदरनिय भंतेजी डॉ. यशकाश्यपायन महाथेरो यांचे उपस्थित रॅलीची सुरुवात करणेत आली.रॅलीचे सुरुवात आयु रावजी घोलप व आयु आनंद घोलप या जेष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महिला कुस्तीपटू पै.दीक्षा गोठणेकर हिच्याकडे पंचशील ध्वज देऊन रॅलीचे नेतृत्व सुपूर्त केले.रॅलीची सांगता बुद्ध मूर्ती बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारात प्रतिष्ठापीत करून करणेत आली.बुद्ध विहाराचे उदघाटन प्रसिद्ध उधोगपती मा.ऍड सी.आर.सांगलीकर यांचे हस्ते करणेत आले,तर बुद्ध मूर्ती पूजन स्थानिक जेष्ठ महिलांचे हस्ते करणेत आले.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारास अथर्व चॅरिटेबल ट्रस्ट व सी आर सांगलीकर फौंडेशनच्या दान समिती कडून बुद्ध मूर्ती दान करणेत आली.यावेळी प्रा.सजीव साबळे,आनंद कांबळे,अरुण कांबळे व आयु कदम हे बुद्धमूर्ती दान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते..तत्पूर्वी पंचशील ध्वजारोहन आयु शरद घोलप,उदगीरी व आयु.सचिन घोलप दुर्गेवाडी या त्या त्या गावच्या आजी माजी सरपंचाच्या हस्ते करणेत आले..दि.13 रोजीच्या कार्यक्रमाची सांगता भिख्खू डॉ.महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिशन पंचशील ग्रहण करायला लावून व धम्मदेसना दिलेनंतर उपस्थितांना भोजनदान देऊन करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाची सुरुवात फटाक्याच्या अतिषबाजीने व महामानवांना अभिवादन व मानवंदना देऊन जल्लोषात करणेत आली.सकाळच्या सत्रात तरुण कार्यकर्त्यांनी माणगाव येथून आणलेल्या भीमज्योतीचे स्वागत करणेत आले..यावेळी लहान मुले व महिलांची भाषणे झालीत शाहीर रफिक पटेल व लोकजागर कलामंचाच्या कलावंतांनी यावेळी बुद्ध भीम गीते सादर केली.
दुपारच्या सत्रात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करणेत आल्या होत्या तर सायंकाळी डॉ.चेतन वडर
व त्यांचे टीमच्या देखरेखीखाली स्थानिक लोकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर पार पडले.याचा 70 हुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला..
तद्नंतर महामानव जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणेसाठीचा जाहीर सभेचा कार्यक्रम पार पडला या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विचारवंत व बहुजन कष्टकरी जनतेचे नेते डॉ.भारत पाटणकर यांनी संबोधित केले.ते म्हणाले,”बाबासाहेबांनी संपूर्ण भारत बौद्धमय करणेचा संकल्प केला होता, त्या संकल्पानुसार बौद्ध न झालेल्या इतर जातींमध्ये बौद्ध धम्म व बुद्धाला नेणे काळाची गरज बनली आहे, वाढत्या धर्मांध फॅसिझमला रोखायचे असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही”असे ही ते म्हणालेत.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक सतीश भारतवासी यांनी बौद्ध असलेची व्याख्या अचूक शब्दात सांगितली की,”जो व्यक्ती पंचशिलेचे काटेकोर पालन करते तो मग कोणत्याही जाती धर्माचा असला तरी बौद्ध मानायला हवे” तर कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व प्रकल्पग्रस्त बौद्ध संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर दिपक(भाई)गोठणेकर प्रास्ताविकीय भाषणात म्हणाले की “बुद्ध विहार हे ज्ञानाचे केंद्र आहे,या ठिकाणी सर्व जातीधर्मीयांना प्रवेश आहे, गावचे विहार हे सर्व लोकांसाठी खुले असून या विहारात तुम्ही तुमची दुःख सुख मांडू शकता,प्रस्थापित शोषण व्यवस्थेच्या विरोधात एकत्र येऊन चर्चा करू शकता, विचारमंथन करू शकता शिवाय जीवनातील सर्व प्रश्नाची सोडवणूक व लढ्याचे ऊर्जाकेंद्र म्हणून या बुद्ध विहाराकडे सर्व जनतेने पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले..
यावेळी ऍड.सिद्धार्थ काकडे,ऍड.बाळासाहेब अंकलीकर,इंजि.फारूक गवंडी आदी मान्यवरांची भाषणे झाली.
वेगवेगळ्या जाती धर्माशी संबंधित असणाऱ्या सर्व मान्यवर व उपस्थितांना प्रातिनिधिक स्वरूपात बुद्ध मूर्ती देऊन सन्मानित करणेत आले
व त्यांच्याद्वारे सम्यक संबुद्ध सर्वदूर जाती धर्मात पोहचवणेचे आवाहन करणेत आले.
उपस्थितांत बंडखोर सेनेचे मा.निलेश मोहिते,सा.कार्यकर्ते मा.आयवळे,श्रमिक मुक्ती दलाचे मारुती पाटील,डी के बोडके,
श्याम कोठारी,जगन्नाथ कुडतुडकर,दाऊद पटेल तर बौद्ध विकास प्रकल्पग्रस्त संघटनेचे अनंत कांबळे,विलास कांबळे,
दिलीप सोनवणे,पत्रकार राहुल घोलप, दिनकर घोलप,संपत सोनवणे,प्रकाश कांबळे,शंकर घोलप,चंद्रकांत घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आंतरजातीय विवाह करून बौद्ध धम्माच्या विचार व संस्कार मार्गाने वाटचाल करणाऱ्या आयु विनोद कांबळे व आयु अश्विनी पवार कांबळे यांचा बुद्ध मूर्ती देऊन डॉ.पाटणकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला तर विश्वास मागाडे व प्रमिला मागाडे या धम्मशिक्षण चळवळ चालवणाऱ्या दाम्पत्यानी बुद्ध विहारास स्व निर्मित अशोक चक्र भेट देऊन सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन सावळा मास्तर स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचार मंचाच्या रणधीर कांबळे,अजय कांबळे,प्रकाश कांबळे,काशिनाथ कांबळे,संजय कांबळे,रवी तांबे,सचिन कांबळे, प्रवीण कांबळे,संदेश कांबळे, हेमंत कांबळे,निलेश,कांबळे,प्रज्वल कांबळे,अंकुश कांबळे, सम्यक गोठणेकर,जीवक गोठणेकर,संदीप कांबळे, शुभम घोलप आदी जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी व माता रमाई महिला उपसिका संघाच्या महिलांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष नजीरभाई चौगुले हे होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनील कांबळे यांनी तर आभार एसएमजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय गोठणेकर यांनी मानले.
एकूण कार्यक्रम सयोजकांचे भावनेतून खालील प्रमाणे..
बुद्ध घ्यावा बुद्ध द्यावा बुद्ध सर्व जात धर्मींयांत पेरावा
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समस्थ भारतीयांना 1956 साली बुद्ध दिला..
तत्कालीन आमच्या भीमसैनिकांनी व अनुयायांनी आमच्या डोंगर खेडे भागात 1958 ला बुद्ध आणला..
तो घराघरात बसवला…मनामनात वसवला..
मात्र आमच्या गावच्या बौद्ध कुटुंबांची संख्या कमी असलेने शिवाय रोजगार मजुरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यन्त गरिबीची तथा हलाखीची असलेने आम्हांकडून बुद्ध विहार निर्माण होऊ शकले नव्हते,ते सध्या समस्थ गावकऱ्यांच्या पाठींब्याने निर्माण झाले आहे. त्याचा उदघाटन कार्यक्रम दि.१३ एप्रिल 2023 रोजी ऍड.सी.आर.सांगलीकर साहेबांच्या सहकार्याने बुद्धमूर्ती दान व प्रतिष्ठापना होऊन तर
दि.14 एप्रिल 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित सर्व जात धर्मीय मान्यवराना प्रतिनिधिक स्वरूपात बुद्ध मूर्ती देऊन..
अश्याप्रकारे दि.13 रोजी बुद्ध घेणे व दि.14 रोजी डॉ बाबासाहेबांच्या जयंती निमित्त
त्यांनीच दिलेला तथागत बुद्ध बौद्धेत्तर समाज बांधवांना देने हा अभिनव कार्यक्रम संपन्न झाला..
बुद्ध म्हणजेच विचार..(शांती, अहिंसा,मानवता,समता,
स्वातंत्र्य,बंधुता, विश्वमैत्री,प्रज्ञा,शील,करुणा,ज्ञान,विज्ञान,सन्मार्ग, पारमिता आदींचे आगार)
बुद्ध मूर्ती हे विचारांचे प्रतीक आहे.
दीपक गोठणेकर
आंबेडकरी चळवळ कार्यकर्ते,बोधिसत्व युवा विचारमंच व प्रकल्पग्रस्त संघटना अध्यक्ष
डॉ.आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 17,2023 21:17 PM
WebTitle – Ambedkar Jayanti celebrated in Gothnegaon village Shirol sangli