तालासेरी (Thalassery): केरळमधील एका जिल्ह्यात बॉम्ब बनवताना स्फोट होऊन कथित स्फोटात 20 वर्षीय RSS आरएसएस कार्यकर्त्याला आपला हात गमवावा लागला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कन्नूरमधील थलासेरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात संघाचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत त्यांचे दोन्ही तळवे फाटले. विष्णू (20) असे जखमी झालेल्या rss स्वयंसेवकाचे नाव असून तो एरंजोलीपालम येथील रहिवासी आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास थलासेरी येथील एरंजोलीपलेम परिसरात घडली. बॉम्ब बनवताना कथितपणे स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉम्ब बनवताना हा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी rss कार्यकर्त्याचे नाव विष्णू असे असून त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सध्या या RSS च्या स्वयंसेवकाला कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात केरळच्या कन्नूर जिल्ह्यातही असाच एक बॉम्बस्फोट झाला होता,या स्फोटात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. हा बॉम्ब स्फोट एका घरात झाला. ही घटना थलासेरी पोलीस स्टेशन हद्दीतील असून, थलासेरी लोटस टॉकीजजवळील एका घरात बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव जिथिन नदम्मल असे असून त्याला स्फोटानंतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कन्नूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले होते.केरळमध्ये 30 दिवसांत बॉम्ब बनवताना हिंदुत्ववादी कार्यकर्ता जखमी होण्याची ही दुसरी घटना आहे.
गाईचं गोमूत्र पिणे मानवासाठी हानिकारक ; संशोधन
दलाई लामा यांचा लहान मुलासोबतचा किस व्हिडिओ नेखळबळ
प्रेमी समजून भावा-बहिणीला झाडाला बांधून जबर मारहाण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 13,2023 15:06 PM
WebTitle – RSS worker loses hand in the blast while making bomb