मुंबई: बार्टी फेलोशिप साठी Barti Fellowship गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळाने सोमवारी मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता,तुमचा विषय काय आहे मला माहिती नाही,असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणेच टाळले असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे मागासवर्गीय समाजात संतापाची लाट उसळली आहे.विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळात दिलीप त्रिभुवन,स्वाती अदोडे,अमोल खरात अन सामाजिक कार्यकर्ते अजय कांबळे आदींचा समावेश होता.काल विद्यार्थ्यांनी यासंदर्भात सोशल मिडियावर म्हणजे मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर देखील ट्रेंड केला होता.
बार्टी च्या फेलोशिप बाबत नेमकी तक्रार काय आहे?
बार्टीच्या २०२१ च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BANRF 2021 अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांची फेलोशिप सरकारने निधीच्या अभावी रखडून ठेवली असल्याचा आरोप संशोधक विद्यार्थ्यानी केला आहे.
बार्टी या संस्थेची स्थापना २०१२ ची. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या शंभरी प्रित्यर्थ ही फेलोशिप सुरू केली गेली. २०१२ ला ५ विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊन केली गेलेली सुरुवात पुढीलप्रमाणे
२०१२ – ५
२०१३ – १६
२०१४ – १०१
२०१५ – १५६
२०१६ – १०७
२०१७ – १००
२०१८ – ४०८
२०१९+२०२० – ५०९
अश्या २०१२ ते २०२१ या काळात एकूण १४०२ विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मंजूर झाली.
बार्टीच्या धर्तीवर २०१९ साली सारथी आणि महाज्योति या योजना सुरू झाल्या.
सारथी अंतर्गत मिळालेल्या फेलोशिप पुढीलप्रमाणे
२०१९ – ३७७+१४६ वाढीव
२०२० – २०७
२०२१ – ५५१
२०२२ – ८५१
एकूण २१३२
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सोबत दुजाभाव
माहितीसाठी – सारथी अंतर्गत एकूण जाहिराती केवळ ८०० जागांच्या निघाल्या होत्या, आणि २१३२ फेलोशिप दिल्या गेल्या म्हणजे एकूण १३३२ फेलोशिप या वाढीव दिल्या गेल्या. यासाठी सरकारने कुठून निधी आणला?
महाज्योति अंतर्गत दिल्या गेल्या फेलोशिप
२०१७-२०२१ – ७५१
२०२२-२३ – १२९१
एकूण २०४२
माहितीसाठी – महाज्योति अंतर्गत ५०० आणि २०० अश्या ७०० जाहिराती निघाल्या होत्या. याचाच अर्थ महाज्योति अंतर्गत १३४२ फेलोशिप वाढीव दिल्या गेल्या यासाठी सरकारने निधी कुठून आणला? असा प्रश्न संशोधक विद्यार्थी विचारत आहेत.
आता बार्टी अंतर्गत २०० जणांना फेलोशिप देऊन ६६१ जणांसाठी निधी नाही म्हणत सरकारने फेलोशिप नाकारलेल्या आहेत. हे विद्यार्थी गेले ४३ दिवस आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र भरातून आलेल्या या विद्यार्थ्यांचा मुक्काम बुद्ध भूमी फाउंडेशन बुद्ध विहार वालधुनी कल्याण येथे असून समाज बांधव त्यांच्या राहण्याची सोय बघत आहेत.
बार्टीच्या माध्यमातून अनेक अनावश्यक खर्च
बार्टीच्या माध्यमातून अनेक अनावश्यक खर्च केले जात असल्याचा आरोप संशोधक विद्यार्थी करत आहेत. यासाठी त्यांनी भीमा कोरेगाव चे नियोजन,त्यावेळी केले जाणारे जेवणदान वगैरे खर्च यावर बोट ठेवले आहे.तसेच हा खर्च सरकारने पर्यटन खात्याच्या माध्यमातून केला गेले पाहिजे असेही म्हटले आहे.मात्र हा खर्च बार्टीच्या माध्यमातून केला जातो! बार्टी च्या माध्यमातून रॅली वगैरे काढल्या जातात.बार्टीचा मूळ उद्देश संशोधन आणि तांत्रिक शिक्षण आहे ज्याला सरकार कडून हरताळ फासला जातो आहे.असा गंभीर आरोप संशोधक विद्यार्थ्यांनी केला आहे.
संशोधन झाले नाही, संशोधक तयार झाले नाही तर याचा मोठा परिणाम फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीवर होणारा आहे. अशी खंत हे विद्यार्थी बोलून दाखवतात.
सारथी आणि महाज्योतिला अजिबात विरोध नाही मात्र आम्हाला सापत्न वागणूक का?
सारथी आणि महाज्योति अत्यंत स्तुत्य उपक्रम असून त्याला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. पण निधीच्या बाबतीत ही सापत्न वागणूक का? आणि या भरती सरसकट केल्या जात असताना बार्टीला मात्र आधी परीक्षा, नंतर मुलाखत वगैरे निकष लावण्याचे कारण काय? असा प्रश्न हे संशोधक विद्यार्थी विचारत आहेत.
एससी चा १९००० कोटींचा अखर्चित निधी गेला कुठे?
बार्टीच्या २५० कोटी निधी शिवाय सामाजिक न्याय विभागाचा २८७६ कोटी बजेट आहे.
याशिवाय फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील ३ वर्षांचा एससी चा १९००० कोटींचा अखर्चित निधी गेला कुठे?
हा निधी कधी पाटबंधाऱ्याला लावतात कधी शेतकरी कर्जमाफीला कधी इतर गोष्टीत खर्च केला जातो अशी तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे.
मध्यंतरी शेतकरी कर्जमाफीला १५०० कोटी तर पाटबंधाऱ्याला ५३ कोटी वळवले अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आज काय या सरकारकडे निधी नाहीय का? पण फक्त वेळकाढूपणा चालढकल बाकी काही नाही.
हाच मुद्दा जर सारथी किंवा महाज्योतिचा असता तर दुसऱ्या दिवशी निधी उपलब्ध झाला असता.
की एखाद्याचा बळी गेल्याशिवाय सरकारला आणि समाजाला जाग येणार नाही का? असा आगतीक प्रश्न या विद्यार्थ्यानी विचारला आहे.
शिवाय या माध्यमातून जे विद्यार्थी फेलोशिप घेऊन पीएचडी झालेले आहेत त्यांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी होऊन या आंदोलनाला बळ दिले पाहिजे.असे आवाहन विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने केले आहे.
अनुसूचित जाती साठी निधी नाकारण्याचे, अडविण्याचे काम – इ झेड खोब्रागडे
आंदोलन करीत असलेल्या 861 विद्यार्थी यांना PhD felloship साठी 225 कोटी चा निधी आवश्यक आहे. यावर्षीच्या बजेट मध्ये सामाजिक न्यायासाठी अनुसूचित जातींच्या विकासासाठी scsp मध्ये 16494 कोटी ची तरतूद आहे. खरं तर ही तरतूद 20060 कोटींची पाहिजे, लोकसंख्या नुसार. अनुसूचित जाती साठी निधी नाकारण्याचे, अडविण्याचे काम शासनाचा वित्त विभाग करीत असतो. योजनेसाठी वेळेवर पुरेसा निधी ,बजेट मधील उपलब्ध न झाल्यामुळे, योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. हा आतापर्यंतच्या सगळ्याच सरकारचा अनुभव आहे.
बार्टी ही सामाजिक न्याय विभागाची संस्था आहे, तेव्हा, बार्टीला 225 कोटींचा निधी मान मुख्यमंत्री व मान उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ उपलब्ध करून द्यावा. इच्छा शक्ती दाखवा, मान मुख्यमंत्री फोन वर आदेश देतात, द्या आदेश, अन्याय दूर करा. मुख्यमंत्री यांचेकडे खाते व संपूर्ण अधिकार असताना आंदोलन करावे लागते. चांगलं नाही.
आम्ही सरकारला लिखित स्वरूपात अनेकदा सांगितले आहे की बार्टीच्या ध्येय धोरणाची, कार्यपद्धतीची ,कारभाराची समीक्षा करावी. 12 ऑगस्ट 2021 ला तत्कालीन सा न्या मंत्री सोबतच्या बैठकीत मुद्धे मांडले होते. सामाजिक न्याय विभागाने अन्याय अत्याचार करू नये. सर्वसामान्यांच्या सरकारला शोभत नाही.
इ झेड खोब्रागडे
‘मोदी हटाओ देश बचाओ’ देशभर का झळकत आहेत पोस्टर्स?
मंत्रालयाबाहेर एकाच दिवशी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न;एक मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 04,2023 11:44 AM
WebTitle – Barti Fellowship