मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी म्हणजेच मॉर्निंग वॉक करतेवेळी हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.आज सकाळी नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क येथे मॉर्निग वॉक करत असताना मनसे चे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे हे नेहमीप्रमाणे आज मॉर्निग वॉकला गेले होते.त्यावेळी शिवाजी पार्क येथे चार अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमी झाले असून त्याच्यावर जवळच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे समजते. हा हल्ला राजकीय वैमन्यस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदुजा रुग्णालयातून व्हीलचेअर वर येताना दिसले देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी म्हणजेच मॉर्निंग वॉक करतेवेळी हल्ला झाल्यानंतर त्यांना नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं,यावेळी त्यांच्या हाताला फॅक्चर झाल्याचे दिसून येत असून पायांना सुद्धा मार दिल्याचे दिसत आहे,यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांना व्हीलचेअरवर बसून बाहेर आणण्यात आलं,यानंतर ते त्यांच्या गाडीत बसून रवाना झाले.
एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, चार अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता.
यावेळी संदीप देशपांडे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला दुखापत झाली असून
त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार करण्यात आले,नंतर व्हीलचेअरवर त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यानंतर ते गाडीतून निघून गेले.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची ओळख मनसैनिक म्हणून आहे.त्याच्या प्राथमिक राजकारणाची सुरुवात शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या भारतीय विद्यार्थी सेना या संघटनेतून झाली. त्यावेळी या विद्यार्थी संघटनेचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाहायचे.
भटक्या कुत्र्याने चावा घेत 1 महिन्याच्या बाळाला हॉस्पिटलमधून पळवून नेले
व्हॅलेंटाईन डे,बजरंग दल च्या गुंडांना लोकांनीच पळवून पळवून मारलं
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 03,2023 13:54 PM
WebTitle – mns-leader-sandeep-deshpande-attacked-during-morning-walk