हुपरी : ‘भारतीय संविधान हे सर्व भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय देणारे असून संविधान आपल्या जगण्यात उतरले पाहिजे, जगण्याचा भाग बनले पाहिजे’, असे प्रतिपादन संविधान संवादक मा. राजवैभव शोभा रामचंद्र यांनी केले. ते रविवार २६/०२/२०२३ रोजी हुपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन शाहूनगर येथे युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्या मार्फत आयोजित एक दिवसीय ‘चला संविधान समजून घेवूया!’ या संविधान संवाद प्रशिक्षण शिबीरात प्रमुख मार्गदर्शक/संवादक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा बौद्ध धम्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण भोसले यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्याध्यक्ष डॉ.संतोष भोसले यांनी केले.शिबिरात विविध खेळ, गमती जमती, गणिते, गटचर्चा, सचित्र प्रबोधन, रोजच्या जगण्यातील सामान्य उदाहरणे या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने संविधान समजून सांगण्यात आले.
संविधानाबाबतचे समज आणि गैरसमज याची स्पष्टोक्ती करण्यात आली.
समारोपीय सत्रात प्रा. डॉ. सुभाष इंगळे यांची शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल
आणि आयु. सुहास किरण हुपरीकर यांना समाजरत्न आणि समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
भारतीय संविधान दैनंदिन जगण्याचा भाग बनवूया-राजवैभव
अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. या एक दिवसीय शिबीरात विलास दादा मधाळे भोज, लहू शिवाजी कांबळे महे,
रवींद्र रामा कांबळे नवे दानवाड, राजू काशाप्पा कांबळे नवे दानवाड, भिकाजी कांबळे महे, विशाखा सुभाष इंगळे कबनूर,
रोहिणी विशाल मधाळे निपाणी, शुभम विशाल मधाळे निपाणी, अनुप्रिया अर्चना आत्माराम कागल,
उमाकांत सुरेश कांबळे गोकुळ शिरगाव, संदीप यशवंत खांडेकर कसबा बीड,कृष्णात बापू जोगडे कसबा बीड, अनिल सुरेश असोदे अक्कोळ,
रणजीत रामचंद्र कांबळे यळगुड, नितीन दिनकर कानडे कोगनोळी, खंडेराव रामचंद्र कांबळे प्रयाग चिखली, सुखदेव सुरेश कांबळे केर्ली, मेघराज अण्णाप्पा कांबळे इचलकरंजी, विकी भास्कर गडकरी केर्ली, आशिष नथुराम शिंदे कोल्हापूर, अनिकेत मच्छिंद्र कांबळे कसबा वाळवे, सूर्यकांत दिनकर ढाले कुरुंदवाड, विजय भरमू श्रावस्ती नवे दानवाड,
अविनाश चंद्रकांत कांबळे सांगली, संजय हरी कांबळे, अशोक कुरणे हुपरी, गजानन कांबळे शिरदवाड, ज्योती गजानन कांबळे शिरदवाड, नानासो कांबळे हुपरी, मंगेश नानासो कांबळे हुपरी, संजीवनी श्रीकांत भोसले मांगुर, सुधाकर कांबळे हुपरी यांनी प्रशिक्षण घेतले. आयोजकांमार्फत या सर्वांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
“एक हिंदू मुलीच्या बदल्यात 10 मुस्लिम मुलींना फसवा , तुम्हाला सुरक्षा आणि नोकरी देऊ”
व्हॅलेंटाईन डे,बजरंग दल च्या गुंडांना लोकांनीच पळवून पळवून मारलं
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 28,2023 11:45 AM
WebTitle – Let’s make the Indian Constitution a part of daily life-Rajvaibhav