शाहरुख खान च्या पठाण चित्रपटाने नैराश्याचे वातावरण आणि दाटून आलेले मळभ दूर करत बॉलीवूड मध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं आहे.त्यामुळे या चित्रपटाच्या यशाने बॉलीवूडमध्ये देखील दिवाळी सारखं वातावरण पाहायला मिळत असून बॉलीवूड कलाकार आनंद व्यक्त करत आहेत,दुसरीकडे शाहरुख खान अभिनीत चित्रपट पठाण चं बॉयकॉट करावं यासाठी काही लोक प्रचार करताना दिसत आहेत,मात्र सामान्य जनतेने या लोकांना दुर्लक्ष करत शाहरुख खान चा पठाण चित्रपट जोरदार हिट केल्याची माहिती समोर आलीय,अशातच आता शाहरुख खान च्या पठाण चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग थेट राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटर मध्ये झाल्याने भाजपच्या राजकारणाला उचलून धरणाऱ्या समर्थन देत देशात भेदभावपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या बॉयकॉट गॅंग ला या स्क्रिनिंग मुळे धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रपती भवनाच्या कल्चरल सेंटरमध्ये पठाणचे स्पेशल स्क्रीनिंग
शाहरुख खान च्या पठाण चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
आता हा चित्रपट राष्ट्रपती भवनात प्रदर्शित करण्यात आल्याचे वृत्त आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार पठाणचे स्पेशल स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनाच्या कल्चरल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं.
एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेस सेक्रेटरी असलेले माजी राष्ट्रपती डॉ. एसएम खान यांनी
चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
एसएम खान 2002 ते 2007 पर्यंत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे प्रेस सचिव होते.
पठाण रोज नवनवे विक्रम करत आहेत
रिलीजच्या तिसऱ्या दिवशीही शाहरुख खान च्या पठाण चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच आहे. या चित्रपटाने केवळ 4 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार चित्रपटाने शनिवारी 52 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यानुसार चित्रपटाची एकूण कमाई 217 कोटींवर गेली आहे.नव्या आकडेवारीनुसार चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार करत ब्लॉकबस्टर हिट मध्ये स्थान मिळवले आहे.
गांधी यांचा खून पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून झाला होता का?
अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 31,2023 13:26 PM
WebTitle – Screening of Shah Rukh Khan’s film ‘Pathan’ at Rashtrapati Bhavan Cultural Centre