गायीचे शेण मूत्र अन 33 कोटी देव यांच्याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत.गायीचे शेण,मूत्र हे आरोग्यवर्धक असते का? त्यात काही औषधी गुणधर्म असतात का? गायीच्या पोटात 33 कोटी (तेहतीस कोटी) देव असतात का? गाईच्या शेणामुळे अणुबॉम्ब,आण्विक उर्जेपासून संरक्षण मिळते का? याबाबत अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनशी संबंधित असणारे डॉक्टर प्रदीप पाटील काय म्हणतात जाणून घेऊया.
गुजरातच्या एका कोर्टानं भन्नाट निकाल दिलाय..
“गायीत २८ करोड पवित्र धर्मस्थळं आणि ३३ कोटी देवता असतात..”
खरंच असतात…म्हणजे,
गायीच्या शरीरात किडनी, लिव्हर, मेंदू, वगैरे वगैरे सर्व स्थळं असतात. त्यांना धर्म नसतो. त्यांचे विधी नसतात. ते आपापली कामे करत असतात. त्यात पावित्र्य वगैरे काही नसते. त्यात एक तर रोग असतात नाहीतर निरोग असतात.
गायीत अनेक रोगजंतू असतात. त्यांना देवता म्हणावे तर…ते रोग पैदा करतात. रोगांची नावे आहेत, लेप्टोस्पायरोसिस, अॅनाप्लाझमोसिस, बेबेसिओसिस, हिमोग्लोबिनुरिया, अँथ्रॅक्स, टाॅक्सिकोसिस, टी.बी.,ब्रुसेल्लोसिस, हगवण,…इ.
ही काही देवांची नावे नाहीत. मग हे देवांचे रोग म्हणून कायदा करायला काय हरकत आहे?
विज्ञान मात्र या “देवांना” रोगी करणार्या सूक्ष्म अनुभूतींना रोगजंतू म्हणते. त्यांची नावे देखील आहेत..मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, क्लाॅस्ट्रिडियम नोव्ही, पॅराइन्फ्लुएंझा व्हायरस, हगवणीचा व्हायरस…वगैरे.
आता हे पोटातले सूक्ष्म..वैश्विक अनेक “देव” आहेत.
पण हे देव कोर्टाला दिसलेच नाहीत. ३३ करोड मात्र दिसले! दिव्य दृष्टी!! दुसरे काय..
गायीचे शेण मूत्र अन 33 कोटी देव यांच्याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत.
गुजरातच्या याच कोर्टानं आणखी एक भन्नाट निकाल दिलाय…
“शेणावर आण्विक किरणांचा काहीही परिणाम होत नाही.”
शेण म्हणजे शेण असतं,
सर्व गायींचं सेम असतं..
म्हणजे गायीच्या शेणात नायट्रोजन, कार्बन, सेल्युलोज, काही खनिजे, आणि..संसर्गजन्य जंतू असतात!
यातला कोण आण्विक किरणांना हुसकावून लावतो ते कोर्टाने गुलदस्त्यातच ठेवलंय ! खुद्द आण्विक किरणं देखील म्हणतील की कोर्टानं लै शेणपणा केलाय!!
हा, पण या शेणात जे रोगजंतू आहेत ते मात्र भक्तांची वाटच बघतात आणि लावतात..
सारे भक्त शेण थोपून बसले की मग शेणातले रोगजंतू म्हणजे सालमोनेला, क्लाॅस्ट्रिडियम, लिस्ट्रेला, वगैरे उड्या मारत भक्तांची भक्तीशुद्धी करतात! शेणाच्या गोवर्याने कोरोनाला पळवायला देखील एकजण आमदारीण पळत होती. म्युकरमायकोसिस हा भयंकर काळ्या बुरशीचा रोगही शेणातून पसरतो असे अनेकांनी सांगुनही भक्त गोबर-गोबर भजन कुटत सर्वांग सुंदर गोबरमय होत आहेत.
एवढेच नव्हे तर शेणसाठ्यातनं घातक विषारी वायू जसे की हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया, मिथेन, कार्बन डायआॅक्साईड निर्माण होतात जे भक्तांना सुंद करण्यासाठी उपयोगी पडतील. गोवर्या जाळून हे वायू थेट फुफ्फुसात जातात ज्यातला आर्सेनिक हा विषारी घटक जीवही घेतो.
कोर्टाने भन्नाटपणे असेही म्हटले आहे की,
” गोमुत्राने असाध्य रोग बरे होतात “
खुद्द गायींनाच हे माहिती नव्हते. कारण गोठ्यात जर शेणामुताचा चिखल झाला तर खुद्द गायींनाच रोग होतात. गायींच्या किडन्यांना रोग झाला तर अगदी पू देखील गोमुत्रातून वाहतो आणि भक्त मागचा पुढचा विचार न करता पितात. याच गोमुत्रातून कॅम्पिलोबॅक्टर जंतू आतडी बाद करतात, बोव्हाईन टीबी हा टीबी रोगाची लागण करतो, लेप्टोस्पायरोसिस हा कावीळ, हगवण, थंडीताप, निर्मितो; अॅनाप्लाझमोसिस वगैरे रोगांचा प्रसाद भक्तांना देतात.
कोर्टाने काहीही म्हटले तरी तुमच्या-आमच्या आणि गायीच्या मुत्रात काहीही फरक नसतो. मग प्रश्न पडतो की मानवाचे मुत्र सोडून गायीच्याच मुत्राचा गवगवा करण्यामागे कारण काय?
उघड आहे.
धर्माचे गलिच्छ राजकारण!
गोमुत्राचे अफाट दावे विज्ञानाच्या निकषांवर टिकत नाहीत.
कोर्टाने मात्र हे नजरेआड करून निकाल दिलाय..
वैज्ञानिकता कोर्टाने नव्हे तर प्रयोगशाळेने सिद्ध करायची असते. म्हणूनच..
निकालात काढलाय वैज्ञानिक दृष्टिकोन!!
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री ला धमकी देणारा निघाला ‘भक्त’
ownload bbc डाउनलोड बीबीसी डॉक्युमेंटरी का सर्च करत आहेत लोक?
जगदीश गायकवाड ला मुंबईत मारहाण
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 28,2023 10:00 AM
WebTitle – What is the truth about cow dung, urine, 33 crore gods, protection from atomic bomb?