लायब्ररी मध्ये सापडलेल्या कथित “हिंदूफोबिक” पुस्तकाबाबत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्याच्या मध्य प्रदेश राज्याच्या इराद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आश्चर्य व्यक्त करत लायब्ररी मध्ये सापडलेल्या कथित ‘हिंदूफोबिक’ पुस्तकावर नोंदवल्या गेलेल्या एफआयआरच्या संदर्भात विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या अटकपूर्व जामिनाला आव्हान देण्याच्या मध्य प्रदेश सरकारच्या इराद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत वकिलांना विचारणा केली.
इंदूर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य इनाम उर रहमान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने नंतर बंद केली आहे, म्हणजेच प्राचार्य प्रोफेसर इनाम उर रहमान यांना दिलेला अटकपूर्व जामीन अबाधित राहणार आहे. प्रोफेसर इनाम उर रहमान यांच्यावर वादग्रस्त पुस्तके लिहून महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवल्याचा आरोप होता.
एबीविपी ची अजब गजब तक्रार
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने इनाम उर रहमान यांच्यावरील आरोपाच्या संदर्भाने ‘लायब्ररी मध्ये ‘हिंदूफोबिक’ पुस्तक (Hinduphobic book) ठेवल्याच्या तक्रारीच्या संदर्भात अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना मध्य प्रदेशच्या वकिलांना विचारले की, “हे 2014 चे पुस्तक आहे,ज्यावेळी प्राध्यापक इनाम उर रहमान हे या महाविद्यालयाचे प्राचार्यच नव्हते.त्यांच्या कार्याकाळात ‘लायब्ररी मध्ये आरोप असणारे ‘हिंदूफोबिक’ पुस्तक ठेवण्यात आलेले नव्हते मग त्यांना अटक का करायची?”
“एबीविपी (abvp अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) विद्यार्थी संघटनेने तक्रार दाखल केली होती की पुस्तकात समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे साहित्य आहे. यामुळे दोन समुदायांमधील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हिंसाचार होऊ शकतो”
विशेष म्हणजे,तक्रारदार ABVP सदस्याने, हे पुस्तक ग्रंथालयातून शोधून काढून बाहेर आणलं,
खरतर हा सदस्य या विषयाशी संबंधित अभ्यासक्रमाचा विद्यार्थीच नसल्याचे,
बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संलग्न आहे
आणि देशभरातील विविध कॅम्पसमध्ये साखळी- संघर्ष कार्यक्रमांच्या मालिकेसाठी ती जबाबदार आहे.
प्राचार्य प्रोफेसर इनाम उर रहमान यांनी वैतागून दिला राजीनामा
‘बाहेरील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घातलेल्या गोंधळामुळे मी खूप दुखावलो आहे. मला आता इथे राहायची इच्छा नाही. मला हे कॉलेज उच्च पातळीवर घेऊन जायचे होते पण मला वाटते की हे आता माझ्याकडून शक्य होणार नाही,यापुर्वी इथं असं वाईट वातावरण नव्हतं पण आता ‘ते’ कॉलेजचे वातावरण खराब करत आहेत म्हणून मी इथून जात आहे.”अशी भूमिका प्राचार्य प्रोफेसर इनाम उर रहमान यांनी एएनआय शी बोलताना मांडली होती.
लायब्ररी मध्ये असणारे तथाकथित हिंदूफोबिक पुस्तक काय वाद आहे?
लायब्ररी मध्ये असणारे तथाकथित हिंदूफोबिक पुस्तक हे लेखिका डॉ फरहत खान अन सहलेखिका डॉ. शीतल कंवल यांनी लिहिलेलं असून त्याचं नाव ‘सामूहिक हिंसा और आपराधिक न्याय प्रणाली’ असं आहे.अमर लॉ पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही अशीही माहिती समोर आली आहे.हे पुस्तक 2014 पासून या लायब्ररी मध्ये ठेवण्यात आले होते.आणि ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला ते प्राचार्य प्रोफेसर इनाम उर रहमान हे 2019 मध्ये या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्त झाल्याची माहिती समोर आलीय.या पुस्तकामुळे दोन समुदायांमधील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हिंसाचार होऊ शकतो.” असं तक्रारदार ABVP सदस्याचा आरोप होता, हे पुस्तक ग्रंथालयातून शोधून काढून बाहेर आणलं,खरतर हा सदस्य या विषयाशी संबंधित अभ्यासक्रमाचा विद्यार्थीच नसल्याचे,बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
“अगर आप आदेश को चुनौती देना चाहते हैं, तो आप ऐसा कर सकते हैं। हम इससे निपटेंगे।“
सीजेआय चंद्रचूड म्हणाले,
“जर तुम्हाला आमच्या जामीन निर्णयाला आव्हान द्यायचे असेल तर तुम्ही तसे करू शकता.आम्ही निपटून घेऊ.”
मंदिर मध्ये देवाचं दर्शन घेणाऱ्या दलित तरुणाला बेदम मारहाण; जिवंत जाळण्याचा प्रयत्न
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 16,2023 20:18 PM
WebTitle – ‘Hinduphobic’ book in the library, principal arrested? are you serious?’ The court asked the public prosecutor