उत्तराखंड : उत्तराखंड मध्ये सध्या निसर्गाचा (?) की मानव निर्मित प्रकोप दिसत आहे.उत्तरखंड मधिल आठ शहरात जमीन खचत चालली आहे.जोशीमठ या भागातील जमीन मोठ्याप्रमाणात खचल्याच्या घटना समोर आल्या.एकीकडे ही आपदा सुरू असताना 21 व्या आधुनिक शतकातही माणसांच्या मनातील द्वेष,जातीयवाद काही कमी होताना दिसत नाही,म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.त्यामुळे अशाही परिस्थितीत लोक आपल्या जातीचा धर्माचा नसलेला गंड बाळगून दुसऱ्यांवर अन्याय अत्याचार करण्यात आघाडीवर असल्याचे दिसतेय,अशीच एक घटना सलरा गावातून समोर आली असून,येथे एक मंदिर आहे त्यातील देवाचं दर्शन घेणाऱ्या दलित तरुणाला जबर मारहाण करत जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फसणारी घटना समोर आलीय.
मंदिर प्रवेश केला म्हणून दलित तरुणास मारहाण;जीवंत जाळण्याचाही प्रयत्न
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार,दलित तरुणाला मंदिरात प्रवेश केल्याबद्दल
तथाकथित उच्च जातीय मनुवादी वेडसर लोकांनी बेदम मारहाण करून
जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना उत्तराखंडमधून समोर आलीय.
हे प्रकरण उत्तरकाशी जिल्ह्यातील मोरी भागातील सालरा गावाशी संबंधित आहे,
जिथे मंदिरात प्रवेश करताना दलित युवक आयुषला काही तथाकथित उच्च जातीय मनुवादी लोकांनी मंदिरात बांधले
आणि रात्रभर बेदम मारहाण इतकच नाहीतर त्याला लाकडाने जीवंत जाळण्याचाही प्रयत्न केला गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाला सुमारे 16 तास मंदिरात बांधून ठेवण्यात आलं होतं, तरुणाने कसा तरी त्याचा जीव वाचवला, त्यानंतर तरुणाला जखमी अवस्थेत मोरी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) येथे उपचार देण्यात आले आणि नंतर उपचारासाठी डेहराडूनला रेफर करण्यात आले.
पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी त्याला ,यासाठी मारहाण केली कारण तो केवळ दलित असून त्याने मंदिरात प्रवेश केला.
तारकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे पाच गावकऱ्यांविरुद्ध ( SC/ST ACT ) एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भेटी वर प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 15,2023 13:42 PM
WebTitle – A Dalit youth who was taking darshan of God in a temple in Uttarakhand was brutally beaten; Attempt to burn alive