नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अन माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.आज पहाटे पहाटे म्हणजे सकाळी सहाच्या सुमारासच त्यांच्याघरावर ईडी ने छापेमारी केली.नववर्षाच्या सुरुवातीलाच हसन मुश्रीफ हे ईडी च्या रडारवर आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या राहत्या घरावर ईडी कडून धाड टाकण्यात आली असून, सकाळी 6 वाजल्यापासून ईडी ने कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
ईडी कडून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची चौकशी केली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर छापा टाकण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या मुलाच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांचे भ्रष्टाचाराचे आरोप
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या रडारवर गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ आले होते.
मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
या पार्श्वभूमीवर त्यांनी तब्बल 2700 पानी पुरावा म्हणून ईडी च्या कार्यालयात दिल्याचे समजते आहे.
सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना येथे कोट्यावधी रुपयांचा शेअर घोटाळा करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
यासंदर्भातील पुरावे सोमय्यांनी ईडीच्या कार्यालयात जमा केल्याची माहिती समोर आलीय.
यासंदर्भात ईडीच्या ४ अधिकाऱ्यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली असून
त्यांना आपण कागदोपत्री पुरावे दिलेले आहेत, अशी माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली होती.
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील सहा व्यक्तींचाही यात सहभाग
‘सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मध्ये सामान्य शेतकऱ्यांनी गुंतवणूक केलीय.परंतु माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील सहा व्यक्तींचाही यात सहभाग आहे. असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय.
अबिद हसन मुश्रीफ ,नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ, अशी मुश्रीफ यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे असल्याचे समोर आले असून या व्यक्तींच्या नावे 13 कोटी 30 लाख 49 हजार रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.राष्ट्रवादीचे नेते अन माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी भ्रष्टाचार करून काळा पैसा पांढरा करत मनी लाँड्रिंग द्वारे 78 कोटी 91 लाख 51 हजार 830 रुपयांचे शेअर घेतले असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केलाय.
गेट आऊट रवी ; राज्यपालांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया
‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट नाही?
काश्मीर फाइल्स : नागराज मंजुळे यांचं स्पष्ट मत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 11,2023 10:35 AM
WebTitle – ED raids former minister Hasan Mushrif’s house