अहमदाबाद : गुजरातमधील नडियाद जिल्ह्यात एका बीएसएफ जवानाची BSF Jawan लिंचिंग झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने बीएसएफ जवानाने विरोध केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत जवान शनिवारी चकलासी गावात एका 15 वर्षीय मुलाच्या घरी गेला होता ज्याने कथितरित्या त्याच्या मुलीचा अश्लिल व्हिडिओ सोशल मिडियावर ऑनलाइन पोस्ट केला होता. मुलाच्या कुटुंबीयांनी जाब विचारणाऱ्या जवानावरच लाठ्या काठ्यांनी हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली.यातच त्यांचा मृत्यू झाला.दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी ट्विट केले आहे.
आरोपी मुलगा ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेतील मुलगी ही विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचीही चर्चा आहे, मात्र मुलाने मुलीचा अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर ऑनलाइन पोस्ट केला होता. यानंतर BSF Jawan बीएसएफ जवान त्याच्या कुटुंबीयांसह मुलाच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी गेला.
‘यह खबर हमारे गाल पर तमाचा है’
स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत म्हटलंय की, ‘गुजरातमधील एका मुलाने बीएसएफ जवानाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. जवान मुलाच्या घरी गेल्यावर मुलाच्या घरच्यांनी त्याची हत्या केली. ही बातमी चर्चेच्या बाहेर आहे, ती बातमीत नाही. भरदिवसा एका सैनिकाची हत्या ही आपल्या सर्वांच्या तोंडावर चपराक आहे. गुंडांची हिंमत किती वाढली आहे.
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, जवान पत्नी, दोन मुले आणि पुतण्यासोबत मुलाच्या घरी गेला होता, पण ऐकण्याऐवजी मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी विरोध केला असता जवानावर हल्ला करण्यात आला.
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, जवान, पत्नी, दोन मुले आणि पुतण्यासोबत आरोपी मुलाच्या घरी गेला होता, पण त्यांची तक्रार ऐकण्याऐवजी मुलाच्या कुटुंबीयांनी त्याना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी विरोध केला असता जवानावर हल्ला करण्यात आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 7 आरोपींनी मिळून जवानावर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
यामुळे BSF Jawan जवानाचा जागीच मृत्यू झाला. शहीद जवान बीएसएफ 56 मेहसाणामध्ये तैनात होते.
जवान आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला करणारे सर्व आरोपी घटनेनंतर गाव सोडून पळून गेले होते.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३२३, ५०४, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सर्व 7 आरोपींना सोमवारी दुसऱ्या गावातून पकडण्यात आले.आता मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
आरोपी धर्माने हिंदू त्यामुळे मिडिया मध्ये डीबेट नाही
स्वाती मिश्रा यांनी ट्विट करत म्हटलंय कि आरोपी हिंदू धर्मीय असल्याने यावर कुणीही चर्चा करायला तयार नाही.
जर हेच आरोपी मुस्लिम असते तर मात्र मिडियाने देशात असंतोष माजवला असता.
वंचित आघाडी व शिवसेना युती संदर्भात लवकरच घोषणा
फ्रॅक्चर्ड फ्रीडम कोबाड गांधी ; पुस्तकात नेमकं काय?
भगवान बुद्धांच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यावरून वाद, प्राचार्यांचे स्पष्टीकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 27,2022, 11:35 AM
WebTitle – BSF Jawan: Girl’s pornographic video, BSF jawan beaten to death