गुजरात मध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी, राज्यातील भाजप सरकारने शनिवारी समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा समान नागरी संहितेची चर्चा सुरू झाली आहे. समान नागरी संहिता काय आहे आणि त्याची मागणी का करण्यात आली आहे ते जाणून घेऊया?
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले की गुजरात मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या उद्देशाने एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
समान नागरी संहिता म्हणजे काय?
समान नागरी संहिता म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान नियम असा भाजपकडून प्रचार केला जात आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असेल. या कायद्याच्या अंमलबजावणीवर हाच कायदा विवाह, घटस्फोट, जमीन मालमत्तेचे वाटप यामध्ये लागू होईल, ज्याचे पालन सर्व धर्माच्या लोकांना बंधनकारक असेल.
भाजपच्या अजेंड्यात समान नागरी संहिता समाविष्ट
भाजपच्या अजेंड्यात समान नागरी संहिता समाविष्ट आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समान नागरी संहितेचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केला होता. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर स्त्री-पुरुष समानता येईल आणि लोकांनाही अनेक प्रकरणांमध्ये समान न्याय मिळेल, असे भाजपचे म्हणणे आहे.
उत्तराखंड मध्येही समान नागरी संहिता समिती गठित करण्यात आलीय
या अगोदर उत्तराखंड मध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. याशिवाय दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रमोद कोहली, राज्याचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिंग, मनू गौर आणि सुरेखा डंगवाल या समितीचे सदस्य असतील.देशात सगळीकडे हळूहळू समिती गठित करून समान नागरी संहिता लागू केली जाईल असे चित्र दिसत आहे.
समान नागरी संहितेतील महत्त्वाचे मुद्दे –
– एकसमान नागरी संहिता कायदा, लागू केल्यास, विवाह, वारसा आणि वारसाहक्क यासह अनेक समस्यांशी संबंधित असे अनेक जटिल कायदे अधिक सुलभ होतील.
– एकसमान नागरी संहिता सर्व नागरिकांना लागू असेल, धर्म किंवा श्रद्धा काहीही असो.
– समान नागरी संहिता लागू झाल्यास विद्यमान व्यक्ती कायदा रद्द होईल. यामुळेच या कायद्याला ठराविक धर्मांकडून अनेकदा विरोध केला जातो.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 29,2022, 19:35 PM
WebTitle – What is Uniform Civil Code? Approval to set up committee in Gujarat