लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन प्रधानमंत्री असतील. ऋषि सुनक यांना लिझ ट्रस यांनी मोठ्या फरकाने हरवले, शेवटच्या टप्प्यात लिझ ट्रस यांना 81 हजार 326 मते मिळाली. तर ऋषी सुनक यांना अवघी ६० हजार ३९९ मते मिळाली. तिसर्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात लिझ ट्रस ऋषी सुनक यांच्यापेक्षा खूप पुढे असल्याचे सर्वेक्षणात सांगण्यात आले.
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता नवीन प्रधानमंत्र्यांच्या नावाची म्हणजेच लिझ ट्रस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या. विशेष बाब म्हणजे ऋषि सुनक ने पाच फेऱ्यांमध्ये लिझ ट्रस यांना मागे टाकले होते मात्र अंतिम फेरीत लिझ ट्रस ने बाजी मारली.
बोरिस जॉन्सन यांना ऋषि सुनक यांच्यामुळेच राजीनामा द्यावा लागला होता
ऋषि सुनक हे बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे ते पहिले होते. बोरिस जॉन्सन यांना ऋषि सुनक यांनी प्रधानमंत्री व्हावे असे वाटत नव्हते. शेवटच्या टप्प्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सुमारे 1 लाख 60 हजार सदस्य मतदान करणार होते. या टप्प्यात ऋषि सुनक यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
ऋषि सुनक यांनी गाईची पूजा केली होती,भारतात ते खूप व्हायरल झालं होतं
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ब्रिटन मधिल भारतीयांनी ऋषि सुनक यांच्या विजयासाठी हवनाचे आयोजन केले होते.तसेच ऋषि सुनक यांनी गाईची पूजा देखील केली होती,त्याचे व्हिडिओ सोशल मिडियात मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाले होते.
लिझ ट्रस यांच्या भाषणात भविष्यातील धोरणांच्याबाबत सुतोवाच
विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात 47 वर्षीय लिझ ट्रस यांनी आपल्या भाषणात भविष्यातील धोरणांच्याबाबत झलक दाखवली. एकीकडे करात कपात करून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीची योजना राबविण्याबाबत त्या बोलत होत्या. दुसरीकडे, ब्रिटन युरोपियन युनियनमधून वेगळे झाल्याबद्दल त्यांनी माजी प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचेही आभार मानले. लिझ ट्रस यांच्या पहिल्या भाषणातून काय संकेत मिळतात ते जाणून घेऊया.
लिझ ट्रस यांनी सांगितले की, मी ही संपूर्ण मोहीम एका कंझर्व्हेटिव्हप्रमाणे चालवली. आता मी कंझर्व्हेटिव्हप्रमाणे राज्य करेन.
मित्रांनो, येत्या दोन वर्षांत आपण काय करू शकतो, हे दाखवून द्यायचे आहे, असे त्यांनी पक्षातील सदस्यांना सांगितले.
ट्रस यांनी माजी प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचे आभार मानले.त्या म्हणाल्या की, बोरिस, तुम्ही ब्रेक्झिटची अंमलबजावणी केली.
जेरेमी कॉर्बिनला तुम्ही त्यांची जागा दाखवून दिलीत. तुम्ही देशातील जनतेला कोरोनाची लस दिली,
आणि व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर उभे राहण्याचे धाडस दाखवले. कार्लिलेपासून कीवपर्यंत तुमची प्रशंसा केली जात आहे.
टाटा ग्रुप चे सायरस मिस्त्री यांचा अपघात कसा झाला? गाडीचे फोटो आले समोर
आज प्रधानमंत्री मोदींवर टीका केल्याने तुरुंगात जाण्याचा धोका आहे – माजी न्यायाधीश
मोफत धान्य घोषणा राजकीय आणि कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात,जाणून घ्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 05,2022, 20:50 PM
WebTitle – Liz Truss is the new Prime Minister of Britain The Indian origin Rishi Sunak dream was shattered