सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते पा रंजित यांचे चित्रपट नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आले आहेत.अतिशय परिणामकारक भाष्य करण्यात पा रंजित यांचा हातखंडा राहिला आहे.त्यामुळे प्रेक्षक वर्गाला आपल्या कलाकृतीकडे खेचण्यात आणि प्रभावित करण्यात ते नेहमीच यशस्वी ठरले आहेत.त्यांनी कायम समाजातील उपेक्षित वंचित वर्गाच्या व्यथा आपल्या सिनेमाच्या गोष्टीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे देशातील एक मोठा वर्ग त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत असतो,आणि विशेष बाब म्हणजे यात भाषा प्रांत जात धर्म यांचा कोणताही अडसर ठरलेला नाही.ही गोष्ट इथं खास नोंद घेण्यासारखी आहे.नुकतेच पा रंजित यांच्या धम्मम या शॉर्टफिल्मची महाराष्ट्रात सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.यातील भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिल्पासोबत असणारी मुलगी या दृष्याबद्दल चर्चा सुरू झालीय.
पा रंजित यांच्या धम्मम या शॉर्टफिल्मची महाराष्ट्रात सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.यातील भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिल्पासोबत असणारी मुलगी या दृष्याबद्दल चर्चा सुरू झालीय.SonyLIV वरील आगामी व्हिक्टीम या वेबसिरीज मधिल चार कथांपैकी एका कथेचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक पा रंजीत सोमवारी सकाळी “धम्मम” या त्यांच्या आगामी लघुपटावर मिडियाशी चर्चा करताना म्हणाले की, कथानक त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांपासून प्रेरित आहे.
धम्मम – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यातून घेतली प्रेरणा
आपल्या लघुपटाबद्दल बोलताना पा रंजित म्हणाले, “जेव्हा व्यंकट प्रभू सरांनी मला या वेबसिरीजसाठी बोलावले, तेव्हा मी द बुद्ध अँड हिज धम्म (लेखक डॉ. बी. आर. आंबेडकर ) हा ग्रंथ वाचत होतो या ग्रंथाने मला धम्मावर एक कथा लिहायला भाग पाडले.”.
धम्मम एका अरुंद मार्गाच्या मध्यभागी दोन पात्रांच्या भेटीभोवती फिरते आणि जेव्हा दोघांपैकी एकाला दुसरा मार्ग द्यायचा नसतो तेव्हा गोष्टी वाढतात.धम्मम विषयी बोलताना पा रंजित सांगतात की “लहानपणी माझ्यासोबत असे काही घडले होते. त्यामुळे भांडण झाले नाही, पण मला कळले की मार्ग मोकळा करून कोण आणि का देतात आणि ते असे का करतात यामागे जातीचे राजकारण असतं,”. “जेव्हा मी त्या वाटेने माझ्या शाळेत जायचो, तेव्हा मला नेहमी दलदलीत उतरून चप्पल घाण न करता माझ्या शाळेत पोहोचावं लागत असे. आता याचा विचार केल्यावर मला वाटले की त्यामागे एक थ्रिलर कथा आहे आणि त्यातूनच धम्मम आली. अस्तित्वात आहे,”
एका दृश्यावर काही लोक नाराज मात्र काही लोकांचे समर्थन
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय? धम्मम या लघुपटतील एक दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.या दृश्यात एक मुलगी भगवान गौतम बुद्ध यांच्या खांद्यावर चढताना दिसते.तेव्हा तिचे वडील ते पाहतात,या दोघांत त्यावेळी घडलेला संवाद काहीसा असा आहे असे बोलले जात आहे,
वडील- वेडी झालीस का? देवाच्या अंगावर चढतेस?
मुलगी- “बुद्धाने सांगितले आहे की देव नाही, तुम्ही त्याला (बुद्ध) देव का म्हणता?”
मात्र या दृश्यावरून काही लोकांनी आता यावर नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मिडियातील काही निवडक प्रतिक्रिया
मैत्रेय दीपक यांनी म्हंटलं आहे की ही पूर्णपणे चुकीची मांडणी आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नागपूर येथे धम्म दीक्षा घेतानाच्या वेळचा फोटो शेअर करत दीपक यांनी म्हंटलंय की, संदेश कोणत्या फ्रेम मधून कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवा..विद्वत्तेचा प्रकांड पंडित वयाच्या ६५ व्या वर्षी इतक्या व्याधी जडलेल्या असून उठून उभे राहून बुद्धांना वंदन करत आहेत…इकडे बौद्ध धम्म काय सांगतो हे ही माहिती नसणारे ज्ञान पाजळायला लागलेत.. विहारात जायला १००० कारणे हे मुलांना स्वतःचा कसा धम्म पोहोचवणार? मुलांना योग्य फ्रेम दाखवा.
बुद्ध कालिन लेणी,आणि पालि भाषा अभ्यासक अरविंद भंडारे यांनी म्हंटलं की मन / विचार नास्तिकतेकडे झुकले की अशी मांडणी होते.
पुढे ते म्हणतात की ,इथे प्रश्न लहान मुलीचा तिच्या कृत्याचा किंवा मूर्तीचा नसून,
दिग्दर्शकाच्या विचारधारेचा आहे जो तुम्हाला तुम्ही नास्तिक व चार्वाकवादी आहात असे समजतोय किंवा दर्शवण्याचा प्रयत्न करतोय.
नीलेश प्रमिला जाधव म्हणतात,दोन्ही फ्रेम समोरा समोर आहे कोणत्या फ्रेम मधून काय तुम्हाला संदेश घ्यायचा असेल तो तुमचा तुम्ही घ्या.
१) १४ अॉक्टोबर १९५६ ला नागभूमीत नागवंशीय धम्मराजाला मनोभावे वंदन करणारा प्रकांड पंडित
२) देवच बोलला देव नाही मग याला तुम्ही देव का म्हणता ? हे प्रतीमेवर चढून बोलणारी चित्रपटाची निरागस मुलगी
22 प्रतिज्ञा अभियान सदस्य कार्यकर्ते विनोद पवार म्हणतात,पा रंजित ची सोनी लिव वर ” धम्मम” वेबसिरीज आली आहे. सध्या ज्याच्यामुळे एवढा फेसबुकवर गोंगाट चालू आहे ते दृश्य त्यातलेच आहे. ती वेबसिरीज अगोदर पहा, कोणत्या अंगाने ते दृश्य आले आहे ते पहा मग गोंगाट करा.
गणेश चव्हाण यांनी पोस्टर शेअर करत म्हंटलंय की, वास्तववादी चित्रपटातून जातीव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या,काळाच्या कितीतरी पलिकडे पाह्यची प्रतिभा लाभलेला, दृष्टा दिग्दर्शक रणजीत पा याने, अत्यंत कल्पकपणे बुद्ध मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. हे यातून पुरतं स्पष्ट होतयं.बाकी ज्या कथित बौद्धांच्या भावना दुखावल्या गेल्यात, त्यांनी शेंदूर फासलेल्या बौद्ध लेण्यांची अवस्था पहावी,आई एकविराच्या चरणी जाऊन, तिकडं आपल्या भावंनांना बिंधास्त मोकळी वाट करून देत डोकं आपटून घ्यावं.
मयूर लंकेश्वर म्हणतात,बुद्धाच्या खांद्यावर उभी राहून जिद्दीचे पंख लावलेली आभाळाला गवसणी घालण्यासाठी तयार झालेली मुलगी दाखवणे ही कल्पनाच किती अफलातून liberating अनुभूती देणारी आहे.ह्या फ्रेमवरून काही कडवट बौद्धांच्या कचकड्या भावना दुखावल्याचे समजले.बुद्धाला देव बनवणाऱ्या धर्मगुंडषडयंत्र वाद्यांच्या कानाखाली चपराक हाननारे हे टेकिंग आहेच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे “बुद्ध हा माणूस आहे, मार्गदर्शक आहे, दीपस्तंभ आहे , त्याला दगड बनवू नका” हा मोठा संदेश आहे.
मंजूषा यांनी म्हटलं ,
आधी movie तर बघा… आधीच prejudice mind नी judgement देऊन टाकता…
आणि Pa.Ranjit हे नावं दिसलं कि शाश्वती असते…!!!
नक्की बघावा हा movie प्रत्येकाने.
माया रुक्मिणी म्हणतात, बुद्ध म्हणजे स्वातंत्र्य
अॅडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी व्हिडिओ शेअर करत म्हणलं आहे की,
बुद्धांच्या खांद्यावर चढून आकाश बघण्याचा प्रयत्न करणारी ही मुलगी….
मूर्तीतील देव मानणाऱ्या आणि मूर्तीतच देव असतो असे मानून त्या मुर्त्या व प्रतिकांसाठी
मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च बांधणाऱ्या लोकांचे खाडकन् डोळे उघडणारी आजच्या पिढीची प्रतिनिधी आहे.
बाप मुलीला सांगतोय की,
“तू खाली उतर देवावरून..!”
मुलगी म्हणते,
“बुद्धानी सांगितले आहे की इथे कोणी देव नाही, तुम्ही बुद्धांना देव का म्हणता?”
*वयाने मोठी झालेली, मोठ्या मोठ्या पदांवर बसलेली या देशातील माणसे कधी विचार करणार? …म्हणे शीलान्यास झालेल्या दिवशी मुद्दाम काळे कपडे घातले….. अहो तुमचे मन काळे आहे.
Nitin Jayaben Shingrakhiya (गुजरात) यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे,ती अशी – ही मुलगी इतर धर्माच्या देवाच्या पुतळ्यावर उभी राहिली असती तर देशात अराजक माजले असते, समाजकंटकांचा जमाव घराघरात आग फुंकण्यासाठी पोहोचला असता, लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या आणि #Boycott digital चळवळ निर्माण झाली असती
‘Natchathiram Nagargirathu’ first look:पा रंजितचा नवा चित्रपट पोस्टर
विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे ?
New Wage Code: खाजगी क्षेत्रात आठवड्यातून 4 दिवस काम – 3 दिवस सुट्टी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 06 2022, 13:10 PM
WebTitle – why-is-the-buddha-shown-in-pa-ranjiths-film-dhammam-becoming-a-subject-of-controversy