जगातील सर्वात पहिले शास्त्रज्ञ म्हणून तथागत भगवान बुद्ध यांच्याबद्दल म्हटलं जातं.प्रत्येक गोष्टीला कारण असतं,बुद्ध जगाची निर्मिती ईश्वराने किंवा एखाद्या शक्तीने केली हेच नाकारतात.”जगाची निर्मिती झाली यावर बुद्धाचा विश्वास नव्हता,तर ते “उक्रांत” झालं असं त्यांचं मत होतं” बुद्धाने हे मत मांडणे आणि एकोणिसाव्या शतकात महास्फोटाची संकल्पना बिगबँग थिअरी ने सृष्टीची निर्मिती कशी झाली त्यावर शास्त्रज्ञांचे एकमत होते ही दोन्ही मते सारखीच आहे.मात्र काही लोक भगवान बुद्ध यांचा पराभव करू शकत नसल्याने विटंबना करतात बुद्ध मूर्ती शिल्प यांना गंध,शेंदूर फासून हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात.देश भरातील अशा अनेक लेण्या विहारे हडपण्यात आली आहेत.नुकतेच चेन्नई येथील एक प्रकरण समोर आले आहे.तिथे असणाऱ्या बुद्ध मूर्ती ची हिंदू देवता म्हणून पूजा केली जात होती,या बुद्ध मूर्ती असणाऱ्या वस्तूला नाव देण्यात आलं “थलैवेट्टी मुनिप्पन मंदिर” Thalaivetti Muniyappan Temple आता कोर्टाने हस्तक्षेप करत ही पूजा थांबवली आहे.
चेन्नई: 1 ऑगस्ट (पीटीआय) मद्रास उच्च न्यायालयाने सालेम जिल्ह्यातील एका मंदिरातील मुख्य देवतेची मूर्ती बुद्धाची आहे, ‘थलाईवेट्टी मुनिप्पन’ किंवा “थलैवेट्टी मुनिप्पन मंदिर” Thalaivetti Muniyappan Temple नाही असे घोषित करण्यात आले आहे.पुरातत्व विभागाच्या आयुक्तांनी सादर केलेल्या तपासणी अहवालाचा अभ्यास केल्यानंतर न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश (Justice Anand Venkatesh) यांनी ही घोषणा केली, तसेच तामिळनाडू हिंदू रिलिजिअस अँड चॅरिटेबल एंडोमेंट (एचआर अँड सीई) Tamil Nadu Hindu Religious and Charitable Endowment (HR&CE) ला मंदिराचा ताबा विभागाकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण ?
चेन्नईतील एक मंदिर(?) येथे गेली अनेक वर्षे बुद्ध मूर्तीची पूजा बुद्धिस्ट पद्धतीने केली जात होती,मधल्या काही वर्षात त्यात खंड पडला.त्यानंतर तिथे हिंदूधर्मातील कर्मकांड पद्धतीने पूजाअर्चा सुरू झाली.यानंतर सालेममधील बुद्ध ट्रस्टच्या वतीने एक रिट याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये सदर मूर्ती ही बुद्ध मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला,तसेच हिंदू देवता म्हणून तिची पूजा केली जात आहे हे थांबविण्याची विनंती करण्यात आली होती.यानंतर एएसआयला थलाईवेट्टी मुनियप्पन मंदिरातील या मूर्तीची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते,सदर मूर्तीची ओळख आणि तिच्या पुरातनतेबद्दलचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यास सांगितले होते.
पद्मपाणी बोधिसत्व बुद्ध मूर्ती
ही मूर्ती बुद्धाची होती की नाही, या वादावर घटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये न्यायालय निर्णय देऊ शकत नाही,
असे निरीक्षण नोंदवल्यानंतर न्यायालयाने प्रधान सचिव आणि आयुक्त, पुरातत्व विभाग,
तमिळ विकास यांना मंदिराची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रधान सचिवांनी आपल्या अहवालात नमूद केले की हे शिल्प एकसंध दगडात कोरून बनवले आहे.मूर्तीच्या कमळाच्या पीठावर “अर्धपद्मासन” किंवा “पद्मपाणी बोधिसत्व” म्हणून ओळखल्या जाणार्या बुद्ध मूर्तीप्रमाणे बसलेल्या स्थितीत आढळून आली आहे. हात “ध्यान मुद्रा” अवस्थेमध्ये असून,डोक्यावर कुरळे केस, उष्णीसा आणि लांबलचक कानातले यांसारखी बुद्धाची लक्ष्ण असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.यावरून ही बुद्ध मूर्ती असल्याचे स्पष्ट होते.
पुरातत्व विभागाच्या अहवालात बुद्धाची प्रतिमा असल्याचे पुष्टी मिळाल्याने, त्याला मंदिर मानणे योग्य होणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायलयाने अहवाल पाहून कोट्टई रोड, पेरीयेरी गावातील सदर जमिन याचिकाकर्त्या बुद्धिस्ट ट्रस्टला परत देण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.तसेच हिंदू पद्धतीने केली जाणारी पूजा तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले.पुरातत्व विभागाला या मालमत्तेचा ताबा घेण्याचे तसेच आतमध्ये हे बुद्धाचे शिल्प असल्याचे दर्शविणारा बोर्ड लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने पुढे असे निर्देश दिले की सामान्य लोकांना या ठिकाणी भेट देण्याची परवानगी असेल परंतु शिल्पासाठी कोणतीही पूजा किंवा इतर धार्मिक कार्यक्रम करू नयेत.
प्रकरणाचे शीर्षक: पी. रंगनाथन आणि इतर वि. तामिळनाडू राज्य आणि इतर प्रकरण क्रमांक: 2011 चा W.P.No.4715
उद्धरण: 2022 LiveLaw (मॅड) 328
याचिकाकर्त्याचे वकील: श्री. एस. साथिया चंद्रन प्रतिवादीचे वकील: श्री. एस. यशवंत अतिरिक्त सरकारी वकील (R1, R2, R5), श्री. T.K. Saravanan,
सरकारी वकील (R3, R4 आणि R6)
विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे ?
New Wage Code: खाजगी क्षेत्रात आठवड्यातून 4 दिवस काम – 3 दिवस सुट्टी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 04,2022, 20:00 PM
WebTitle – buddha-idol-worshiped-as-a-hindu-deity-the-court-banned-the-worship-thalaivetti-muniyappan-temple